Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकपाथरे बुद्रुक ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध

पाथरे बुद्रुक ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध

पाथरे । Pathare

अनेक सेवाभावी उपक्रमांनी नेहमीच चर्चेत असणार्‍या सिन्नर तालुक्याच्या पूर्व सरहद्दीवरील पाथरे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली.

- Advertisement -

कोपरगाव आणि सिन्नर तालुक्यातील राजकीय विचारांचा प्रभाव या गावावर असतो. त्यामुळे निवडणूक कोणतीही असो ती नेहमीच अटीतटीची होत असते. पण, यावेळी मात्र एक वेगळाच ध्यास गावातील कारभार्‍यांनी अंगीकारत ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा चंग बांधला आणि तो त्यांच्या प्रयत्नाने यशस्वीही झाला.

प्रभाग एक मधून रवींद्र रंगनाथ चिने, वाल्मीक दगडू माळी, मनीषा योगेश बिडवे, प्रभाग 2 मधून सुजाता भाऊसाहेब नरोडे, कुसुम राजेंद्र रहाटळ, प्रतिभा चंद्रकांत चिने, प्रभाग 3 मधून भारती मच्छिंद्र गीते, स्वाती सचिन नरोडे, निकिता संजय थोरात या सदस्यांनी अर्ज दाखल केले होते.

नऊ जागांसाठी 9 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. आता फक्त निवडीची औपचारिक घोषणा बाकी आहे. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यावर दोन्ही गटांनी आपापसात अडीच अडीच वर्ष सरपंच पद भूषविण्याची तयारी दर्शवली आहे. बिनविरोध निवड झालेल्या सर्व सदस्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले आहे.

त्यांनी गावात सुरू असलेल्या निवृत्तीनाथ मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी प्रत्येकी 50 हजार रुपयांची देणगी स्वच्छेने मंदिर जीर्णोद्धार समितीकडे सुपूर्द केली आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पाडल्याबद्दल तहसीलदार राहुल कोताडे व पोलीस प्रशासनाने पाथरे बुद्रुकच्या ग्रामस्थांचे कौतुक केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या