Tuesday, April 23, 2024
Homeनगरपाथर्डी-शेवगाव शहर पाणी योजनांना सुधारीत प्रशासकीय मान्यता

पाथर्डी-शेवगाव शहर पाणी योजनांना सुधारीत प्रशासकीय मान्यता

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव व पाथर्डी या दोन्ही शहरांच्या स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांना आज (दि.20) सुधारीत शासकीय मान्यता मिळाली असून पाथर्डीसाठी 95.85 कोटी तर शेवगाव योजनेसाठी 82.98 असा निधी मिळणार आहे अशी माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.

- Advertisement -

सध्याची योजना जुनी झाल्याने शेवगाव व पाथर्डी शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे आमदार मोनिका राजळे ह्या 2018 पासून या दोन्ही शहरासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजुर होण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होत्या. अखेर 8 नोव्हेंबर 2021 रोजी शासन निर्णय निर्गमीत झाला होता. त्यावेळी पाथर्डी शहर पाणी पुरवठा योजना प्रकल्पासाठी 73 कोटी 47 लाख व शेवगाव शहर पाणी पुरवठा योजनेसाठी 67 कोटी 27 लाख रूपयांच्या योजनेस मंजुरी मिळाली होती. त्यानुसार पाथर्डी नगरपरिषदेने निविदा ही प्रसिध्द केली होती. व शेवगांव नगरपरिषदेची निविदा प्रक्रिया सुरु होती.

परंतू त्याच दरम्यान जिल्हा दर सुची व राज्य दर सुची चे दर वाढले होते. तसेच जीएसटी दर सुध्दा बदलले. त्यामुळे या योजनेची निविदा प्रक्रिया थांबवावी लागली होती. परंतू नवीन दर सूची व जीसएसटी मुळे वाढीव किंमतीसह पुन्हा नवीन अंदाज पत्रक तयार करणे आवश्यक होते. त्यानुसार पुन्हा राज्य शासनाकडे नवीन दर सूची नुसार अंदाज पत्रकास मान्यता व शासनाचे सुधारीत प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आले. दरम्यान जून मध्ये राज्य शासन बदलले आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेवून पाठपुरावा केला.

या प्रयत्नांना यश येऊन अखेर आज (दि.20) नवीन अंदापत्रकासह शासनाची सुधारीत शासकीय मान्यता मिळाली. त्या नुसार महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत पाथर्डी शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास 95.85 कोटी च्या पाणी योजनेस तसेच शेवगांव शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास 82.98 कोटी च्या पाणी योजनेस आज सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आता या योजनेच्या निविदा प्रक्रिया तात्काळ करुन प्रत्यक्ष कामास सुरुवात करणे सोयीचे झाले आहे.

शेवगांव व पाथर्डी शहराच्या अत्यंत जिव्हाळयाच्या पिण्याच्या पाण्याच्या स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांना मंजूरी मिळाल्याणे लवकर या योजनांची कामे सुरू होऊन दोन्ही शहरांचा पाणी प्रश्न सुटणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या