Thursday, April 25, 2024
Homeनगरसाडेचार हजार पानांची माहिती देण्याचे मुख्याधिकार्‍यांचे आदेश

साडेचार हजार पानांची माहिती देण्याचे मुख्याधिकार्‍यांचे आदेश

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

माहिती अधिकार कायद्यांतर्गत पाथर्डी नगरपालिकेला मागितलेली माहिती जनमाहिती अधिकारी यांनी वेळेत न दिल्यामुळे तब्बल साडेचार हजार पानांची माहिती विनामोबदला देण्याचे आदेश प्रथम अपिलीय अधिकारी तथा मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी पालिकेचे जनमाहिती अधिकारी यांना दिले आहेत.

- Advertisement -

याबाबात माहिती अधिकार कार्यकर्ते शंकर राऊत यांनी 2 डिसेंबर 2021 रोजी पाथर्डी नगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत चालवण्यात येत असलेला घनकचरा व्यवस्थापन, संकलन व विल्हेवाट करण्याच्या ठेक्याबाबत माहिती अधिकार कायद्यांतर्गत पालिकेचे स्वच्छता निरीक्षक तथा जनमाहिती अधिकारी दत्तात्रय ढवळे यांना सविस्तर माहिती मागितली होती. परंतु, सदरील अर्जाबाबत विहित मुदतीत संबंधित अधिकारी यांनी माहिती पुरवली नाही.

त्यामुळे शंकर राऊत यांनी प्रथम अपिलीय अधिकारी तथा मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्याकडे अपील दाखल केले.या अपिलावर सुनावणी घेत मुख्याधिकारी लांडगे यांनी अपिलार्थी यांचे अपील मान्य करत जनमाहिती अधिकारी दत्तात्रय ढवळे यांना सदरील माहिती विनामूल्य पुरविण्याचे आदेश मुख्याधिकारी यांनी दिले. यानंतर सदरील माहितीच्या 4534 प्रती विनाशुल्क आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय ढवळे यांनी शंकर राऊत यांना दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या