Friday, April 26, 2024
Homeनगरपाथर्डी बाजार समितीत प्रशासक राज

पाथर्डी बाजार समितीत प्रशासक राज

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपल्याने बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सहकारी संस्था सहाय्यक निबंधक भारती काटुळे यांनी सोमवार (दि.25) कार्यालयात येऊन प्रशासकपदाचा पदभार स्विकारला.

- Advertisement -

यावेळी बन्सी आठरे, आपचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड, गोरक्ष ढाकणे, विष्णू सातपुते, बाळासाहेब बोरुडे, कुशाभाऊ मोरे, अनिल सरोदे, अशोक काकडे, गणेश शेळके, माजी सचिव दिलिप काटे यांच्यासह व्यापारी सोमनाथ लाहोटी, गणेश आव्हाड, रघुनाथ सांगळे, सौरभ दानापुरे, अशोक नहार, प्रवीण गुगळे, संतोष गुगळे, संतोष बाफना, संजय पालवे उपस्थित होते. यावेळी कर्मचारी व व्यापार्‍यांनी प्रशासक भारती काटुळे यांचा सत्कार करून स्वागत केले. बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत एक वर्षापुर्वीच संपली होती.

मात्र करोनामुळे निवडणूक घेणे शक्य नसल्याने प्रथम सहा महिने व त्यानंतर पुन्हा सहा महिने विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर 2021 मध्ये निवडणुकीची घोषणा होऊन जानेवारी 2022 मध्ये निवडणूक होणार होती. मात्र, उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडल्याने राज्य सरकारच्या सहकार विभागाने आदेश काढून एक वर्षापूर्वी मुदत संपलेल्या राज्यातील सर्वच बाजार समित्यावर 22 एप्रील 2022 पासुन प्रशासकांची नियुक्ती करण्यासाठी आदेश काढले ते आदेश पाथर्डी बाजार समितीस प्राप्त झाल्याने प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे.

बाजार समितीची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांच्या ताब्यात होती. या आदेशाने ती आता संपुष्टात आली आहे. बाजार समिती वगळता सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेवर आ. मोनिका राजळे यांचे एकहाती वर्चस्व होते. सध्या नगर परिषद, पंचायत समिती जिल्हा परिषदेसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विद्यमान सदस्यांची मुदत संपली असल्याने सर्वच संस्थांचा कारभार हा प्रशासकांच्या हाती आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या