Tuesday, April 23, 2024
Homeराजकीयनेत्यांचा मोठेपणा मिरविण्यासाठी चेल्यांनी जनतेत खोटी माहिती पसरवू नये - पाठक

नेत्यांचा मोठेपणा मिरविण्यासाठी चेल्यांनी जनतेत खोटी माहिती पसरवू नये – पाठक

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

एका वर्षाच्या कालावधीत मतदार संघाच्या विकासासाठी एक छदामही विद्यमान आमदार आणू शकले नाही.

- Advertisement -

ही कोपरगाव करांसाठी शोकांतिका असून, निवेदन मागणी पत्र देण्याचे देखाव्याचे फोटो सेशन करून विकासाचा कळवळा दाखवून सोशल मीडियाचा वापर करण्यातच वर्ष घातले. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशसचिव स्नेहलता कोल्हे यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या निधीतील विकासकामांची भुमीपुजने, उद्घाटने करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम विद्यमान आमदार व त्यांचे चेलेही करत असून शहरातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर राजकारण करून कालवा सल्लागार समितीच्या बैठकीशी जोडून मूळ प्रश्नाकडे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक यांनी केली आहे.

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात मतदार संघासह शहरासाठी मोठा भरीव निधी मिळवून दिला, गेली पाच वर्षेच काय आजपर्यंत त्याच निधीतील कामे शहरात सुरू आहेत. ही वस्तुस्थिती नाकारून आमदारांचे चेलेही जनतेला भुलविण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु शहरातील जनता सुज्ञ असून त्यांना सौ. कोल्हे यांनी केलेला विकास ज्ञात आहे. तो कोणी सांगण्याची आवश्यकताही नाही.

वास्तविक कोपरगाव नगरपरिषद प्रशासकीय इमारत, बसस्थानक इमारत, बाजार ओटे, डिजीटल वाचनालय, नवीन अग्नीशमन, पोलीस स्टेशन इमारत, विशेष रस्ता अनुदान, बंदिस्त नाट्यगृहास निधी, रमाई आवास याोजना, पंतप्रधान आवास योजना, स्वच्छतागृह, गोकुळनगरी पुलाचे कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून काही कामे पुर्णत्वाकडे तर काही कामे प्रगतिपथाकडे आहे.

ही गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात सौ.कोल्हे यांनी मंजूर केलेली कामे दृष्य स्वरूपात दिसत असूनही जनतेची दिशाभूल करण्यात पटाईत असलेल्या नेत्यांच्या चेल्यांना ही कामे कशी दिसणार? वास्तविक कालवा सल्लागार समितीच्या बैठका या मतदारसंघात घेण्याचा निर्णय झाला, राहाता येथील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीच्या वेळी ज्यांनी प्रयत्न केले त्यांनी छातीठोकपणे तुमच्या नेत्यांसमोर सांगितले, त्यामुळे चेल्यांनी स्वतःच्या नेत्यांचा मोठेपणा मिरविण्यासाठी खोटी माहिती पसरवू नये, असा सल्लाली पाठक यांनी दिला.

स्नेहलता कोल्हे यांच्यावर टीका करण्याची ज्यांची पात्रता नाही, ते दररोज भल्या सकाळी ज्या काळया गुळगुळीत रस्त्यावर दिमाखात सायकल सफरीचा आनंद घेता. त्या रस्त्यासारखे विविध रस्ते संपूर्ण मतदार संघात करण्यासाठी कोट्यवधीचा निधी सौ. कोल्हे यांनी आणला असल्याची माहितीही करून घ्यावी.

– दत्ता काले, भाजप शहराध्यक्ष.

- Advertisment -

ताज्या बातम्या