Saturday, April 27, 2024
Homeनाशिकपास्तेतील तरुणाच्या चित्राची अमेरिकेत 'इतक्या' डॉलरला विक्री

पास्तेतील तरुणाच्या चित्राची अमेरिकेत ‘इतक्या’ डॉलरला विक्री

सिन्नर । अमोल निरगुडे Sinnar

तालुक्यातील पास्ते Paste Village गावच्या तरुणाच्या चित्राची अमेरिकेत US तब्बल 300 डॉलरला विक्री झाल्याने तालुक्याचे नाव परदेशात पोहचले आहे.

- Advertisement -

पास्ते गावाचा रहिवाशी असलेल्या प्रसाद गणेश आव्हाड (19) Prasad Ganesh Aavhad या चित्रकाराचे चित्र अमेरिकेतील पोर्टलॅण्ड गावात विकले गेले आहे.

तेथील कॅथे या महिला ग्राहकाने ते तब्बल तीनशे डॉलरला विकत घेतले. बनारस, वाराणसी varanasi येथील एका घाटाचे हे चित्र असून प्रसाद याने फोटोवरून हे चित्र काढले आहे. प्रसादने चित्रकलेचे प्राथमिक शिक्षण सिन्नर येथील राहुल पगारे आणि किशोर पगारे यांच्याकडे घेतले. सध्या तो नाशिकच्या चित्रकला महाविद्यालयात प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे.

प्रसादचे वडील लॉकडाऊन होण्याअगोदर पानटपरी चालवत होते. लॉकडाउननंतर टपरी बंद करावी लागली. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी दुग्ध व्यवसाय सुरू केला. यात त्यांना प्रसादचा लहान भाऊ अभिषेकची मोठी साथ लाभली. मात्र, तरी देखील वडीलांनी प्रसादची कलेची आवड जोपण्यासाठी व शिक्षणासाठी पाठिंबा दिला.

पास्ते गावचे पोलीस निरीक्षक अशोक काकड यांचा मुलगा प्रशांत हा अमेरिकन नागरीक असून त्यांच्या मित्रांनी प्रसादला काशीचा गंगाघाट बनविण्याची कल्पना दिली होती. त्यांनतर चित्राच्या विक्रीनंतरही युएस डॉलर भारताच्या पैशांमध्ये कसे रुपांतर करता येतात यात प्रशांत यांनी त्याला मदत केली. ते डॉलर त्यांनी स्वतःला घेतले आणि वडील अशोक काकड यांना सांगून प्रसादला भारतीय रक्कम मिळवून दिली. तसेच प्रशांत यांची शिपिंग मध्येही प्रसादला बरीच मदत झाली.

फेसबुकमुळे मिळाला प्रतिसाद

चित्र काढून झाल्यानंतर प्रसाद याने फेसबुकवर चित्राची पोस्ट केली. अमेरिकेतील पोर्टलॅण्डची रहिवाशी असलेल्या कॅथे नॉर्डस कॉग हिने ते चित्र विकत घेण्याची तयारी दर्शवली. कॅथे ही फॅशन डिझायनर आणि नृत्यांगना आहे. कॅथेने केलेली कमेंट प्रसाद याने पाहिल्यानंतर लगेच ते चित्र देण्याचा प्रस्ताव मान्य केला. तिने हे चित्र तीनशे अमेरिकी डॉलरला विकत घेण्याचे ठरवले. अशा पद्धतीने या चित्राचा व्यवहार पूर्ण झाला. काही दिवसापूर्वी हे चित्र कुरियरने पाठवण्यात आले. योगायोगाने 14 सप्टेंबर रोजी हे चित्र तिच्या वाढदिवशीच तिला मिळाले.

कुटुंबाचे सहकार्य

माझं चित्र विकल गेल तेव्हा माझ्यापेक्षा वडिलांना जास्त आनंद झाला होता. चित्राला एवढे मोठे यश मिळाले आहे. त्यात माझ्या एकट्याचे कष्ट नसून माझ्या कुटुंबाचे देखील सहकार्य आहे. वडील मला शेतीकडे लक्ष न देता नेहमी चित्रांचा सराव करायला सांगतात. त्यामुळे मला भरपूर वेळ मिळतो. या यशामागे चित्रकार राहुल व किशोर पगारे यांचेही योगदान महत्वाचे आहेे.

प्रसाद आव्हाड, चित्रकार

- Advertisment -

ताज्या बातम्या