Saturday, April 27, 2024
Homeजळगावबसस्थानकांवर निष्काळजीपणा !

बसस्थानकांवर निष्काळजीपणा !

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

लॉकडाऊननंतर सहा महिन्यांनी राज्य परिवहन महामंडळाची सेवा काही अटी व शर्तीवर सुरू करण्यात आली होती.

- Advertisement -

ती आता पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे. एकीकडे परीवहन मंडळाचे अर्थकारण रुळावर आणण्यासाठी हे आवश्यक आहेच.

परंतु, प्रवाशांनी खबरदारी घेऊन प्रवास करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र बेफिकीर वृत्तीमुळे बहुतांश बसस्थानकांवर सर्व नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची वाहतूक सुरू आहे.

येथे प्रवाशांमध्ये सोशल वा फिजिकल डिस्टन्सिंग नियमांचे पालन केले जात नाही तर कित्येकांनी तर मास्क चा वापरच करीत नसल्याचे आढळून येत आहे.

एकूणच प्रशासनाच्या आणि प्रवाशांच्या देखिल हलगर्जीमुळे बसस्थानक कोरोनाचा प्रसार करणारे हॉटस्पॉट बनण्याची शक्यता बोलली जात असल्याचे दिसून येत आहे.कोणतीही यंत्रणा कार्यान्वित नसल्याची धक्कादायक बाब

जिल्हयातील बहुतांश बसस्थानक परिसरात सद्यस्थितीत प्लॅटफार्म, रेल्वेगाड्यांमध्ये देखील या नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

केवळ गाड्या सुरू करणे हेच परीवहन महामंडळ व रेल्वे प्रशासनाचे ध्येय असून, कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी कोणतीही यंत्रणा कार्यान्वित नसल्याची बाब समोर आली आहे.कोरोना संक्रमण करण्याचा धोका कायम

प्रवाशांनी तोंडाला मास्कचा वापर आवश्यक करणे, किमान दोन फुटांचे अंतर, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे आदी नियमांचा समावेश आहे. परंतु कोणतीही यंत्रणा नसल्याने एकादा प्रवास करणारा एखादा पॉझिटिव्ह प्रवासी इतरांच्या संपर्कात आल्यास पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. असे प्रवासी अनेकांना संक्रमित करण्याचा धोका कायम असल्याचे दिसून येत आहे.

रस्त्यांवरच गाड्या उभ्या केल्याने प्रवाशांची होतेय गर्दी

जिल्ह्यात पाचोरा बसस्टॅन्डमधे बसेस उभ्या न करता तात्पुरता मंडप टाकून रस्त्यावरच गाडया उभ्या करून प्रवासी बसविण्यात येत आहेत.अशा स्थितीत बसस्थानक तर कोरोनाचे वाहक होणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानक परिसरात प्रवाशी दाटीवाटीने उभे रहतात.अर्ध्या फुटापेक्षाही कमी अंतर तसेच प्लॅटफार्मवर गाडी आल्यानंतर प्रवाशी घोळका करून गाडीत चढताना फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्याचे भान कुणालाही नसल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या