पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे संतप्त; बैठकीतून घेतला काढता पाय

jalgaon-digital
3 Min Read

भुसावळ Bhusaval । संजयसिंग चव्हाण

चाळीस आमदारांच्या (Forty MLAs) फुटीनंतर राज्यात शिवसेनेचे सरकार (Shiv Sena government collapsed) कोसळले. यानंतर पक्षाचे नाव व चिन्ह हा वाद न्यायालयात (Disputes in court) गेला तेव्हापासून ‘सेनाभवनाने’ (‘Sena Bhavanane’) याची गंभीर दखल घेत सभासद नोंदणी व प्रतिज्ञापत्र हा विषय घेवून राज्यभर संघटनात्मक बांधणीचे (organizational structure) काम हाती घेतले. खा.विनायक राऊत यांच्यावर ही मोठी जबाबदारी दिली व लोकसभा मतदार संघ निहाय प्रत्येक संपर्क प्रमुखांकडे सोपविली. याच संदर्भात काल सेनाभवनावर पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Party chief former Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक (meeting) लावण्यात आली. मात्र रावेर लोकसभा मतदार (Raver Lok Sabha Constituency) संघातील पोचट कामगिरी (performance) पाहून उध्दव ठाकरे यांनी नाराजी सह संताप (expressed anger) व्यक्त केला व बैठक सोडून (Leave the meeting) निघून गेले.

याबाबत माहिती अशी की, रावेर लोकसभा मतदार संघाची वरिल विषयावर सेना भवनावर दोन्ही जिल्हाप्रमुख अनुक्रमे समाधान महाजन व दिपकसिंग राजपूत (नवीन नियुक्ती) यांच्यासह यावल, रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ, बोदवड, जामनेर, चोपडा, नांदूरा व मलकापूरचे तालुकाप्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख, तालुका संपर्क प्रमुख, शहर प्रमुख, जिल्हा संघटक, समन्वयक व युवा सेनेचे जिल्हाधिकारी अशा प्रमुखांना आपापल्या कामगिरीचा कच्चाचिठ्ठा घेवून हजर राहण्यास सांगितले होते.

Visual Story # क्रितीचा ‘ठुमकेश्वरी’ अंदाज पाहिलात का?

यात मलकापूर, नांदूरा बुलढाण्यात जोडला तर दोन ठिकणी तालुका प्रमुख नाही तर काही शहर प्रमुखांनी दस्तुरखुद्द उध्दव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीस दांडी मारली. एक जबाबदार व्यक्ती तर उध्दव साहेब येण्याच्या पाच मिनिटे अगोदर बैठकीस आले. त्यापुर्वी दिड तास आधी ही बैठक सुरू झालेली होती. उध्दव साहेब बैठकीला आले तेव्हा त्यांनी समोरची आकडेवारी पाहूनच नाराजी व्यक्त केली. येणार्‍या काळात चोपडा व अन्य तालुके उभे करायचे आहे. जानेवारी महिन्यात बुलढाण्यात राज्यव्यापी मेळावा घ्यायचा आहे. हे असले आकडे असले तर कसे चालेल असे सांगुन नाराजी व्यक्त केली व ही बैठक सोडून निघन गेले.

दरम्यान जिल्हासंपर्क नेते रविंद्र मिर्लेकर यांनी पदाधिकार्‍यांचा खरपूस समाचार घेतला. प्रतिज्ञापत्र 2 हजार करावयाचे होते व सभासद नोंदणी तालुकानिहाय 5 हजार करायची होती. मात्र तसे होवू शकले नाही व याचमुळे उध्दव ठाकरे नाराज झाले.

महापौर जयश्री महाजनांकडून जळगावकरांची दिशाभूल

या संदर्भात शिवसेनेचे या भागाचे जिल्हा प्रमुख समाधान महाजन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले माझ्याकडे भुसावळ व चोपड्याची जबाबदारी आहे. मी वरील दोन तालुके व यावलचे दोन जिल्हा परिषद गट येथील नोंदणी दिली आहे. दिपकसिंग राजपूत नवीन आहेत तर काही तालुक्यामध्ये पदाधिकारी नियुक्त नाही. नांदूरा व मलकापूर हे दोन तालुके बुलढाण्याला जोडले आहे. आमची कामगिरी समाधानकारक असून ती आम्हाला व्यवस्थीतपणे मांडवा आली नसावी.

आम्ही येत्या आठवड्यात एकूण 30 हजार सदस्य नोंदणी करू आता 20/22 हजार नोंदणी झाली आहे. पुढच्या बैठकीत उद्दिष्ठ पूर्ण झालेले असेल असे श्री. महाजन यांनी ‘देशदूत’शी बोलतांना सांगितले. सेना भवनावर झालेल्या या बैठकीची वार्ता जिल्ह्यात पसरली असून शिवसैनिक कामाला लागले आहे तर शिवसेनेच्या गटा तटाच्या हातात आयतं कोलीत आलं आहे.

बलात्काराचा प्रयत्न करणार्‍या नराधमाला पाच वर्षाची शिक्षा

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *