Saturday, April 27, 2024
Homeनाशिकविभाजन विभिषिका फाळणीच्या स्मृतींना उजाळा

विभाजन विभिषिका फाळणीच्या स्मृतींना उजाळा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापनदिन ( Swatantryacha Amrut Mahotsav )समारंभ देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. देशाच्या सर्वांगीण विकासात सर्वधर्मियांचे योगदान हे महत्त्वाचे असून अनेक धर्म, भाषा, संस्कृतीचा वारसा लाभलेल्या आपल्या देशाची सांस्कृतिक परंपरा आजही आबाधित आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे ‘विभाजन विभिषिका स्मृती दिवस’ (Partition Remembrance Day)आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर धर्मदाय सहआयुक्त टी. एस. अकाली, सरदार जसकंवलपाल सिंग बीर, अपर जिल्हाधिकरी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, गणेश मिसाळ, नीलेश श्रींगी, तहसीलदार प्रशांत पाटील यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तसेच टी.आर. चावला, सरदार सुरिंदरसिंग लालसिंग कोच्चर, कुलदीपसिंग नानकसिंग ग्रोवर, अर्जुनसिंग खानचंद हिरानी, मीरा नंदलाल ग्यानचंदानी, मोहिनी चिमदास बलानी, सोमोमल चुमहरमल नागदेव, पद्मा कन्हैयालाल बुधवाणी यांच्यासह शीख, पंजाबी व सिंधी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गंगाथरन डी. म्हणाले, 14 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या फाळणीदरम्यान हजारो लोकांचे स्थलांतर झाले. त्यांना ज्या यातना झाल्या, मनस्ताप आणि दु:ख भोगावे लागले त्याची कल्पना यावी यादृष्टीने 14 ऑगस्ट 2022 हा दिवस फाळणी दु:खद स्मृतिदिन म्हणून पाळण्यात यावा याविषयीची घोषणा पंतप्रधानांनी गत 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून केली होती. त्याला अनुसरून जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज ‘विभाजन विभिषिका स्मृती दिवस’ आयोजित करून विविध उपक्रमांतून फाळणीच्या दु:खद स्मृतींना उजाळा देण्यात आला आहे, अशा भावना यावेळी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी व्यक्त केल्या. प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ यांनी केले.

सुरुवातीला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ‘विभाजन विभिषिका स्मृती दिवस’निमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात गुरू गोविंदसिंग पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज व सिंधू सागर शिक्षण मंडळ व आर. के. कलानी ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षकवृंद सहभागी झाले होते. यानंतर विभाजन विभिषिका दृश्य बोर्डचे आनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सभागृहातील कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमात गुजर स्कूलचे सेवानिवृत्त प्राचार्य हसानंद ओचीराम नेहल्पानी यांनी फाळणी-वेदना, अर्थव्यवस्था आणि संस्कृती या विषयावर तर सरदार एस. कुविंदरसिंग गुजराल, टी.आर. चावला व सागर अ‍ॅकेडमीचे सचिव अर्जुनदास खानचंद हिराणी यांनी ‘दास्तान-ए-विभाजन’ या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमात डॉ. गुजर सुभाष इंग्लिश स्कूल देवळालीच्या विद्यार्थांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले. यात गुरू गोविंदसिंग पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या (Guru Govind Singh Public School and Junior College) विद्यार्थ्यांनी विभाजन वेदनागीत व अभिनयातून सादर केली तर सिंधू सागर शिक्षण मंडळ व आर. के. कलानी ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी फाळणीमधील काही महत्त्वपूर्ण व्यक्ती व घटना अभिनयातून व व्हिडिओतून सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

सूत्रसंचालन तेजश्री कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाच्या अयोजनासाठी उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींगी यांनी परिश्रम घेतले असून त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.

.

- Advertisment -

ताज्या बातम्या