Monday, April 29, 2024
Homeनाशिकथकबाकीमुक्ती योजनेत सहभागी व्हा

थकबाकीमुक्ती योजनेत सहभागी व्हा

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashik

कृषिपंपाच्या (agricultural pump) वीजबिलातून (electricity bill) थकबाकीमुक्त होण्यासाठी थकबाकीच्या रकमेत सुमारे 66 टक्के सूट मिळविण्याची संधी राज्य शासनाच्या महाकृषी ऊर्जा अभियानाच्या (Mahakrishi Urja Abhiyan) माध्यमातून उपलब्ध आहे. नाशिक (nashik) परिमंडलातील 2 लाख 76 हजार 634 शेतकर्‍यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे.

- Advertisement -

या ऐतिहासिक योजनेत सहभागी होऊन कृषिपंपाचे वीजबिल कोरे करावे तसेच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून (MSEDCL) करण्यात आले आहे. या योजनेत वीजबिलांच्या वसुलीतून एकूण 66 टक्के कृषी आकस्मिक निधी (fund) म्हणजेच प्रत्येकी 33 टक्के निधी ग्रामपंचायत (grampanchayat) व जिल्हास्तरावर विकास कामांसाठी खर्च करण्यात येत आहे.

हा निधी संबधीत ग्रामपंचायत व जिल्ह्याच्या क्षेत्रातच स्थानिक वीजयंत्रणेच्या पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी खर्च करण्यात येत आहे. स्वतंत्र खात्यात जमा होणार्‍या निधीतून नवीन उपकेंद्र, नवीन रोहित्र व क्षमतावाढ तसेच नवीन वीजजोडण्या यासह वीज वितरण व उपकेंद्रातील विविध यंत्रणेच्या पायाभूत सक्षमीकरण करण्यात येणार आहे.

त्यामुळे कृषिपंपांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना आणखी दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. कृषिपंपांच्या वीजबिलांतून संपूर्ण थकबाकीमुक्ती (Arrears) व सोबतच भरलेल्या वीजबिलांच्या 66 टक्के निधीतून गावातील वीजयंत्रणेचा विकास या दुहेरी फायद्यासाठी शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महाकृषी ऊर्जा अभियानात शेतकर्‍यांना कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त करण्यासाठी सुमारे 66 टक्के सूट मिळणार आहे. मूळ थकबाकीमधील व्याज व दंड माफी तसेच निर्लेखन यानंतरच्या सुधारित थकबाकीची 50 टक्के रक्कम येत्या मार्च 2022 पर्यंत भरल्यास उर्वरित 50 टक्के थकबाकीदेखील माफ करण्यात येत आहे.

आतापर्यंत नाशिक परिमंडलातील 2 लाख 76 हजार 634 शेतकर्‍यांनी थकबाकीमुक्त योजनेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये त्यांनी थकबाकी व चालू वीजबिलांपोटी 268 कोटी 67 लाख रुपयांचा भरणा केला आहे. यात नाशिक जिल्ह्यातील 1 लाख 26 हजार 436 ग्राहकांनी 163 कोटी 17 लाख तर अहमदनगर जिल्ह्यातील 1 लाख 50 हजार 198 ग्राहकांनी 105 कोटी 50 लाख रुपये वीजबिल भरले आहे.

या शेतकर्‍यांना थकबाकीपोटी भरलेल्या रकमेएवढी सूट, महावितरणकडून निर्लेखनद्वारे मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट मिळाली आहे. नाशिक परिमंडलात 42 हजार 306 शेतकरी वीजबिलांमधून संपूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. यात नाशिक जिल्ह्यात (nashik district) 33 हजार 392 तर अहमदनगर (ahmadnagar) जिल्ह्यातील 8 हजार 914 ग्राहकांचा समावेश आहे.

त्यांनी चालू वीजबिलासह सुधारित थकबाकीच्या 50 टक्के रकमेचा भरणा केला आहे. त्यामुळे सुधारित थकबाकीमध्येही त्यांना सूट व संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळाली आहे.नाशिक परिमंडलातील 7 लाख 44 हजार 710 शेतकर्‍यांकडे एकूण 8064 कोटी 22 लाख रुपयांची एकूण थकबाकी होती. त्यातील व्याज व दंड माफीसोबतच महावितरणच्या निर्लेखन सूटद्वारे आता 5652 कोटी 59 लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे.

त्यातील 50 टक्के रक्कम येत्या मार्च 2022 पर्यंत भरल्यास आणखी 2826 कोटी 29 लाख रुपयांच्या उर्वरित सुधारित थकबाकीची रक्कम माफ होणार आहे. या ऐतिहासिक थकबाकीमुक्ती योजनेत सहभागी व्हावे तसेच चालू वीजबिलाचा भरणा करून वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळावी. वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसह आपल्या गावांतील वीज यंत्रणेचा विकास साधावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या