Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : खंडग्रास सूर्यग्रहण सुरु; गोदावरीत स्नानासाठी नागरिकांची गर्दी

Video : खंडग्रास सूर्यग्रहण सुरु; गोदावरीत स्नानासाठी नागरिकांची गर्दी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

देशात खंडग्रास सूर्यग्रहण सुरु झाले आहे. दोन तास हे सुरुग्रहण असून ते पाहण्यासाठी देशात ठकठिकाणी नागरिकांनी गर्दी केली आहे…

- Advertisement -

ग्रहणकाळात देशातील अनेक मंदिर बंद करण्यात आली आहे. ईशान्येतील भाग वगळता सर्वत्र सूर्यग्रहण दिसत आहे. नाशिकमधील गोदावरी नदीत रामकुंड येथे नागरिकांनी स्नानासाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र आहे. हे वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आहे.

नाशिकच्या ‘काश्मीर’मध्ये वसले राज्यातील पहिले ‘गुलाबी गाव’, पाहा व्हिडीओ…

सूर्यग्रहण म्हणजे नेमकं काय?

सूर्य आपल्या कक्षेत भ्रमण करत असतो. मात्र जेव्हा सूर्य आमि पृथ्वीच्या मध्यभागी चंद्र येतो. तेव्हा आपल्याला सूर्य दिसू शकत नाही. यालाच सूर्यग्रहण म्हणतात. अंशतः सूर्यग्रहण म्हणजेच जेव्हा चंद्रामुळे सूर्याची काही किरणं पृथ्वीपर्यंत येण्यापासून रोखली जातात. यालाच पार्शिअल किंवा अंशतः सूर्यग्रहण असं म्हणतात. भारतात यापुढील सूर्यग्रहण 2 ऑगस्ट 2027 रोजी दिसेल. ते पूर्ण सूर्यग्रहण असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या