Thursday, April 25, 2024
Homeजळगावपारोळा : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पारोळा : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पारोळा – Parola – प्रतिनिधी :

शहरातील कचगाव चौफुलीवर ट्रॅफिकमुळे व खराब रस्त्याने मोठ्या पाईप वाहणारा चौदा चाकी ट्रॉलाच्या धडकेने पंचवीस वर्षीय मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे परिसरात प्रचंड ट्रॅफिक जाम झाली होती .

- Advertisement -

आज पारोळा शहरातील सुभाष रोड परिसरातील रहिवाशी विजय धर्मा बडगुजर (वय 25) आपल्या चारशे सात वाहनाचे शनी मंदिर परिसरात काम चालू होते.

त्यासाठी सायंकाळी 5.45 वाजेच्या सुमारास वाहनाचे साहित्य घेण्यासाठी मोटार सायकल क्र. एम एच 14 बी एल 7637 टी व्ही एस स्टार या वाहनाने साहित्य घेण्यासाठी दुकानावर जात असताना शहरातील कजगाव चौफुलीजवळ जी जे 12 बी डब्लू 8073 ह्या चौदा चाकी मोठ्या ट्रॉलाने धडक दिली.

मोटरसायकलस्वार हा ट्रॉलाच्या चाकाखाली दबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला व मोटरसायकल वरील एक जण राहुल मोहन पाटील हा खाली पडून किरकोळ जखमी झाला असल्याची घटना घडली,

यानंतर ट्रक चालक मात्र फरार झाला आहे या अपघातामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाली होती

अपघातानंतर पोलिस खाते रस्त्यावर- सायंकाळची वेळ असल्याने हायवेलगत नेहमी वर्दळ असते त्यामुळे या परिसरात रस्ता खराब असल्याने नेहमी ट्रॅफिक असते.

त्यामुळे कायमस्वरूपी पोलिसाची नेमणूक करावी ही मागणी होत असते व पोलीस सायंकाळी नसतात आज अपघात झाल्याने आख्ख्या पोलीस खातं ट्रॅफिक मोकळी करण्यासाठी उतरलं होते.

परिवाराचा आक्रोश

विजय हा मनमिळाऊ स्वभावाचा होता त्याच्याकडे चारशे सात वाहन आहे तो स्वतःह चालक होता.

अपघाताचे वृत्त कळताच परिसरात व परिवारात आक्रोश व हळहळ व्यक्त करण्यात आले. याबाबत पारोळा पोलिसात फिर्याद दिल्यावरून ट्राला चालकाविरुद गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या