Wednesday, April 24, 2024
Homeनगरपारनेर तालुक्यातील 43 गावे आजपासून अनलॉक!

पारनेर तालुक्यातील 43 गावे आजपासून अनलॉक!

सुपा |वार्ताहर| Supa

पारनेर तालुक्यात वाढत्या करोनाला आळा घालण्यासाठी 31 जुलैपासून ते 10 ऑगस्टपर्यंत लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांच्याशी संवाद साधत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी 43 गावे लॉकडाऊन पाळण्यात आला. आजपासून (दि.12) या 43 गावांतील सर्व व्यवहार सुरळीत होणार असले तरीही लेव्हल तीनचे पूर्वीचे निबंध कायम असणार आहेत. करोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावेत, असे आवाहन प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी केले आहे.

- Advertisement -

तालुक्यात रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासन आणि पदाधिकारी यांच्या बैठकीत ज्या भागात रुग्ण संख्या वाढत आहे तेथील 43 गावे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या धर्तीवर तहसीलदार ज्योती देवरे यांनी संबंधित गावांमधील भेट देत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार या गावांमध्ये गेल्या 11 दिवसांत काटेकोरपणे निर्बंधांचे पालन करण्यात आले. या 43 गावांमध्ये व्यापारी ,व्यावसायिक नागरिकांनी काटेकोरपणे पालन करत व्यवहार बंद ठेवून स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊनला पाठिंबा दिला. आजपासून पुन्हा एकदा जिल्ह्यातील इतर तालुक्यांप्रमाणे राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार निर्बंध लागू राहणार आहेत. त्यामुळे दुपारी चारपर्यंत दुकाने सुरू असतील पाचनंतर संपूर्ण तालुक्यात जमावबंदी असणार आहे.

संबंधित गावातील जनता कर्फ्यू संपून टाळे बंदी उठणार असली तरीही करोना संदर्भातील पूर्वीचे निर्बंध लागू असणार आहेत. व्यावसायिकांचे दुकाने सुरू झाले, तरीही पूर्वीच्या नियमाप्रमाणे पालन करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच 43 पैकी 10 गावांमध्ये अजूनही रुग्ण संख्या वाढत असल्याने नागरिकांनी नियमाचे पालन न केल्यास पुन्हा त्या गावासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे प्रांताधिकारी भोसले यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या