Friday, April 26, 2024
Homeनगरतहसीलदार देवरेंना अण्णांकडून सबुरीचा सल्ला!

तहसीलदार देवरेंना अण्णांकडून सबुरीचा सल्ला!

सुपा |वार्ताहर| Supa

तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्यासारखे डोक्यावर बर्फ ठेऊन काम करा, आत्महत्येचा (Suicide) विचार चुकीचा, या शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे (Tahsildar Jyoti Devare) यांचे एक तास समुपदेशन केले.

- Advertisement -

रविवारी (Sunday) तहसीलदार देवरे (Tahsildar Jyoti Devare) या अण्णा हजारे (Anna Hajare) यांना भेटण्यासाठी राळेगणसिध्दी (Ralegan Sidhi) येथे गेल्या होत्या. या ठिकाणी हजारे (Anna Hajare) यांनी आधी हा विषय लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचा आहे, यात मी काही बोलू शकत नाही, असे सांगत तहसीलदार देवरे (Tahsildar Jyoti Devare) यांच्याशी बोलण्यास नकार दिला. मात्र, तहसीलदार देवरे (Tahsildar Jyoti Devare) यांनी एक महिला म्हणून माझी व्यथा ऐकून घ्यावी, अशी गळ घातली आणि हजारे (Anna Hajare) यांनी जवळपास 1 तास तहसीलदार देवरे यांचे समुपदेशन केले.

तुम्ही कर्तव्यदक्ष आहात, महिला आहात, खंबीर आहात, आत्महत्येचा विचार सोडून द्या, खंबीर राहा, तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांचा उल्लेख करत, त्यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकार्‍यांना तर किती त्रास होतो ते पहा डोक्यावर बर्फ ठेवा. जर तुम्ही निर्दोष असाल तर नक्कीच चौकशीत ते सिद्ध होईल. धीर धरा असा सल्ला हजारे (Anna Hajare) यांनी तहसीलदार देवरे (Tahsildar Jyoti Devare) याना दिला.

तालुक्यात जे घडते आहे, ते चुकीचे आहे आणि दोन्ही बाजुंनी संयम ठेवावा, असे हजारे (Anna Hajare) म्हणाले. शनिवारी याप्रकरणी चौकशी (Investigation) अंती बोलू असे अण्णांनी सांगितले होते. तहसीलदार देवरे (Tahsildar Jyoti Devare) यांनी जवळपास 1 तास त्यांना कशा प्रकारे त्रास दिला जातो आहे. याबद्दल हजारे यांच्याकडे तक्रार केली व महिलांच्या बाबत किती वाईट प्रवृत्ती आहेत याचे कथन केले. यावेळी तहसिलदार देवरे म्हणाल्या, माझी तुमच्यावर श्रध्दा आहे. मी भ्रष्टाचार नसल्याचा दावा त्यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या