Saturday, April 27, 2024
Homeनगरशिवारफेरीत पारनेरच्या तहसीलदारांना सापडले जुगारी

शिवारफेरीत पारनेरच्या तहसीलदारांना सापडले जुगारी

पारनेर |तालुका प्रतिनिधी|Parner

महाराजस्व अभियानाची पारनेर येथे सुरुवात झाली असून, महाराजस्व अभियानांतर्गत लोकाभिमुख घटक

- Advertisement -

जिल्हाधिकारी,अपर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयापासून गावपातळीपर्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अंतर्गत तहसीलदार ज्योती देवरे यांनी पारनेर येथे शिवारफेरी मोहिमेअंतर्गत शर्तभंग, अतिक्रमणे, अनाधिकृत वाणिज्य वापर या गोष्टी शोधून त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया करण्यात आली आहे. यावेळी शासकीय जागेवर जुगारांचा अड्डाही सापडला. पारनेरमध्ये पाहणी करत असताना नगराध्यक्ष वर्षा नगरे यासह शहरातील नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी या पथकाने अनधिकृत बांधकामे शासकीय जागेवरील अतिक्रमण ज्या कब्जा हक्काने जागा दिल्या त्यामध्ये खरेदी विक्री संघ त्या जागेवर त्यांनी गाळ्याचे बांधकाम केले आहे. काही वतनाच्या जागेवर शर्तभंग जमिनीचा वस्तुनिष्ठ लेखाजोखा मांडण्याचे काम करण्यात आले.

ही पाहणी करीत असताना शासकीय जागेवर पत्रे टाकून जुगारी अड्डा सुरू होता. त्यावर तहसीलदार यांच्या पथकाने छापा टाकला. ते जुगार व मटका यांच्याशी संबंधित होते. त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस त्यांच्यावर पुढील कारवाई करणार आहेत.

या अभियानांतर्गत पारनेर शहरातील 45 अतिक्रमणे, दोनशे अनधिकृत वाणिज्य वापर व दोन शर्तभंग केल्याचे आढळून आले. गणपती देवस्थानच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात वाणिज्य वापर सुरू आहे. वखारीसाठी जी कब्जा हक्काने दिलेली जागा आहे त्या जागेमध्ये हॉटेल व्यवसाय सुरू होता.ती जमीन शासन जमा करून घेण्याचा प्रस्ताव करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली.

बाजार समितीमध्ये अनेक गाळे आहेत त्यांनी वाणिज्य दंड भरावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. नगरपंचायतीचे गाळे आहेत त्यांनी वाणिज्य दंड भरावा. तहसील कार्यालयाच्या आजूबाजूला शासकीय जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे.

त्यांनादेखील महाराष्ट्र जमीन अधिनियमचे कलम 50,2 अन्वये नोटीस देऊन त्यातील अतिक्रमण काढून घेण्यात येणार आहे. गावठाण हद्दीमधील अतिक्रमण भूकंप मापकच्या अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमून गावठाण हद्दीमध्ये अनधिकृत वाणिज्य वापर यांच्यावर दंडात्मक प्रक्रिया राबवून त्याचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

पारनेरमध्ये महाराजस्व अभियान अंतर्गत शिवारफेरीचे आयोजन करण्यात येऊन शासकीय जागांवरील अतिक्रमण, अनधिकृत वाणिज्य वापर, गावठाण हद्दीतील अनधिकृत वाणिज्य वापर, कब्जेहक्काचाया जागांवरील फलक, इनाम, वतन जागांवर वाणिज्य वापर, रस्ता खुला करणे, शेतीगटांची पीकपाहणी, फळबागा पाणीपुरवठ्याच्या साधनांच्या नोंदी पडताळणी, याबाबत संपूर्ण पाहणी करून जमीन वापराचा संपूर्ण लेखाजोखा करणे सुरू करण्यात आले आहे.

– तहसीलदार ज्योती देवरे, पारनेर

- Advertisment -

ताज्या बातम्या