पारनेर (तालुका प्रतिनिधी)
सुपा बस स्थानकावर नुकत्याच एका ऊस तोड मजूर महिलेने गोंडस बाळास जन्म दिला.108 अॅम्बुलन्सची तत्परता व यातील डॉ. विलास काळे यांच्यामुळे बाळ बाळंतीण सुखरूप राहिले
याबाबत सविस्तर माहिती अशी, चाळीसगावचे ऊस तोड मजूर पश्चिम महाराष्ट्रातील एका कारखान्यावरून ऊस तोड हंगाम संपून गावाकडे परतत होते. सुपा गावानजीक आल्यावर त्यातील एका महिलेला प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्या. यामुळे वाहन थांबवून ऊस तोड मजुरांनी सुपा बसस्थानकाचा आश्रय घेतला.
जवळ्यात धाडसी दरोडा… महिलांना मारहाण करत लाखोंचा ऐवज लंपास
तेथील एका जागृत नागरिकांनी 108 रुग्णवाहिकेला फोन केला. माहिती मिळताच चालक किशोर मडके यांनी कॉलवरील डॉ. विलास काळे यांच्यासह तात्काळ सुपा बस स्थनकावर धाव घेतली.
डॉ. काळे तेथे पोहचले तेव्हा महिला प्रसुुतीच्या शेवटच्या टप्प्यात होती. तिला रुग्णालयात हलवणे शक्य नव्हते. त्यामुळे डॉ. काळे यांनी तेथेच त्या ऊस तोड महिलेची सुखरूप प्रसुती केली. या ऊसतोड महिलेने एका गोंडस पुत्रास जन्म दिला.
अमोल कोल्हे करणार अमृता खानविलकरशी लग्न? Instagram पोस्टमुळे चर्चांना उधाण
डॉ. काळे यांनी या महिलेची सुखरूप प्रसुती केल्यावर त्याच ठिकाणी दोन्हींवर प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. बाळ बाळंतीण सुखरूप आसल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले.
108 अॅम्बुलन्सच्या डॉ. काळे व पायलट किशोर मडके यांच्या तत्परतेमुळे एका बाळाचे व आईचे प्राण वाचले. बाळ बाळंतीण सुखरूप आहे.
धक्कादायक! नराधम सासऱ्याने केली सुनेची हत्या, चिमुकल्या नातीलाही संपवलं