Friday, April 26, 2024
Homeनगरपारनेर एसटी डेपो झाला कचरा डेपो; अवैध धंद्यांचा ठरतोय अड्डा

पारनेर एसटी डेपो झाला कचरा डेपो; अवैध धंद्यांचा ठरतोय अड्डा

पारनेर (तालुका प्रतिनिधी)

एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू असल्याने बस स्थानके ओस पडली आहेत. त्यामुळे या परिसरात कचऱ्यांचे ढिग साचले आहेत. तसेच अनेक नागरिकांकडून तसेच व्यवसायिकांकडून कचरा टाकला जात असल्याने बस स्थानके कचरा डेपो झाले आहेत.

- Advertisement -

एक महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यामुळे ओस पडलेल्या स्थानकावर कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. तर काही बस स्थानके रात्रीच्या वेळी अवैध धंद्यांचे अड्डे बनत आहेत. अगोदरच बस स्थानकाला आवकळा आली आहे. प्रवासी नसल्याने येथे तळीराम, भिकारी व फेरीवाले तसेच रिकाम टेकड्यांनी या स्थानकावर कब्जा केला आहे. त्यामुळे शाळकरी मुला-मुलींना कुठेतरी बाजुला जीव मुठीत घेऊन उभे रहावे लागत आहे. अधिकाऱ्यांनी किमान याकडे तरी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

सुपा बसस्थानक की भंगार डेपो

सुपा बस स्थानकावर काही महाभागानी भंगार डेपोच सुरू केला आहे. तेथे दिवसभर गोळा केलेल्या भंगाराचा डेपो लावला जातो व पुढे मोठ्या वाहनांमधून माल सप्लाय केला जातो. एकप्रकारे जणू काही यांनी तेथे अधिकृत कचरा डेपोच चालू केला असल्याची परिस्थिती असून याठिकाणी प्रवाशांना वाईट वागणूक दिली जात आहे. भंगाराच्या साहित्यामुळे तेथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या