Saturday, April 27, 2024
Homeनगरपारनेर नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे संख्याबळ दहापर्यंत पोहचले

पारनेर नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे संख्याबळ दहापर्यंत पोहचले

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर नगर पंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमताचा जादुई आकडा पार केला तरी बेरजेचे राजकारण सुरू आहे. तिसरा अपक्ष नगरसेवक योगेश मते आ. नीलेश लंके यांच्या गळाला लागला असून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने शहरविकास आघाडीसह राष्ट्रवादीचे संख्याबळ दहावर पोहचले आहे. यामुळे सत्ता स्थापनेचा राष्ट्रवादीचा मार्ग अधिक प्रशस्त झाला आहे.

- Advertisement -

प्रभाग तीन मधील अपक्ष उमेदवार मते यांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे राष्ट्रवादीच्या अगोदरच नऊ नगरसेवकांची गट नोंदणी झालेली आहे. तर आता दोन दिवसांत राष्ट्रवादीचे संख्याबळ 10 वर गेले आहे. नगर पंचायत निवडणुकीनंतर आ. लंके, तसेच मते यांच्यात चर्चा होऊन विकासाच्या मुद्यावर राष्ट्रवादी पक्षाला साथ देण्याचा निर्णय मते यांनी घेतल्याचे ते सांगत आहेत.

सुरूवातीपासून राष्ट्रवादी विचारांचे असलेले मते यांनी प्रभाग तीन मधून अपक्ष उमेदवारी केली होती. यापूर्वी मते यांच्या पत्नी पारनेर ग्रामपंचायतच्या सदस्या होत्या. राष्ट्रवादीमध्ये काम करताना ते सुजित झावरे यांचे नेतृत्व मान्य करीत होते. झावरे यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर मते यांनी कोणतीही भूमिका जाहीर केलेली नव्हती. या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी कोणत्याही पक्षाची उमेदवारी न करता अपक्ष निवडणूक लढविली. निवडणूक जिंकल्यानंतर समर्थक कार्यकर्ते तसेच मतदारांशी सल्लामसलत करून मते यांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

70 लाखांची विकास कामे मंजूर

मते यानी प्रभागातील विकास कामांच्या आश्वासनांवर राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या प्रभागातील महाजन मळ्यास जोडणारा 600 मिटरचा रस्ता, तसेच लोणी रस्ता ते ठोंबरे वस्ती हा सव्वा किलोमिटरचा रस्ता मते यांनी आ. लंके यांच्याकडून मंजूर करून घेतला. यासाठी 70 लाखांचा निधी आ. लंके यांनी दिल्याची चर्चा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या