Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रसहलीला निघालेल्या स्कूल बसचा अपघात; २२ जण जखमी, काहींची प्रकृती गंभीर

सहलीला निघालेल्या स्कूल बसचा अपघात; २२ जण जखमी, काहींची प्रकृती गंभीर

परभणी | Parbhani

शैक्षणिक सहलीची बस आणि एसटी बसची धडक झाली. या भीषण अपघातामध्ये २२ जण जखमी झाले आहेत. तर काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

परभणीच्या गंगाखेड-राणीसावरगाव मार्गावर भीषण अपघात झाला. सहलीला निघालेल्या विद्यार्थ्यांची बस एसटी बसला समोरुन धडकली. या मध्ये दोन्ही बसचा दर्शनी भाग पूर्णपणे चेपला.

या अपघातामध्ये दोन्ही बसच्या समोरील बाजूचं प्रचंड नुकसान झालं. एसटी बस आणि स्कूल बस एकमेकांमध्ये घुसल्या होत्या. यात दोन्ही बसच्या काचा फुटल्या. तर दोन्ही बसचे चालकही गंभीर जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी बचावकार्य करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या