Friday, April 26, 2024
Homeनगरपेपर फुटीप्रकरणी मुख्य आरोपी पसारच

पेपर फुटीप्रकरणी मुख्य आरोपी पसारच

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वाणिज्य शाखेतील तृतीय वर्ष परीक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी भिंगार पोलिसांनी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

एका आरोपीला अटक केली असली तरी या गुन्ह्यातील अन्य तीन आरोपी पसार आहेत. पसार असलेल्या तिघांपैकी एक आरोपी शहरातील नामांकित महाविद्यालयाचा शिक्षकोत्तर कर्मचारी आहे. यामुळे पेपर फुटीप्रकरणी त्याला अटक केल्यास अनेक गौडबंगाल बाहेर येण्याची शक्यता आहे.

पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू आहेत. वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षातील कॉस्ट अ‍ॅण्ड वर्क अकाउंट- 3 या विषयाचा पेपर सुरू असताना बाणेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थिनी कार्तिकी बोधले हीने तिच्या मोबाईवरून शिवा साबळे, सनी कांबळे, गौरव सोनार यांना प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅप केली.

यावेळी वर्गावर पर्यवेक्षक असलेल्या शिक्षिकेच्या ही बाब निदर्शनास आली. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य विजय जाधव यांनी भिंगार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी सनी कांबळे याला पोलिसांनी अटक केली. त्याला जामीन मंजूर झाला आहे. पसार असलेल्या तिघांना अद्याप अटक झालेली नाही. पसार असलेल्या आरोपींपैकी एक जण शहरातील नामांकित महाविद्यालयात शिक्षकेत्तर कर्मचारी आहे. त्याला अटक केल्यास अनेक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

मात्र, तो ज्या महाविद्यालयात नोकरी करतो ते महाविद्यालय, संस्थाचालक त्याला या प्रकरणात वाचविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे समजले. शहरातील काही राजकीय व्यक्तींनीही त्याला वाचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

तपासाकडे लक्ष

कार्तिकी बोधले हिने तीच्या मोबाईवरून प्रश्नपत्रिका बाहेर पाठवली. ही प्रश्नपत्रिका बाहेर आल्यानंतर इतर तिघे आरोपी त्या प्रश्नपत्रिकावरून उत्तरपत्रिका तयार करून ती कार्तिकी बोधले हिच्या पेपरला जोडणार होते का? याआधी काही परीक्षार्थींनी पेपर झालेल्या विषयांच्या प्रश्नपत्रिका आरोपींना पुरविल्या होत्या का? बोधले हिच्या याअधीच्या विषयाच्या उत्तरपत्रिकांची तपासणी केल्यास हा प्रकार आधीपण घडला आहे का? हे निदर्शनास येईल. यादृष्टीने भिंगार पोलीस तपास करणार का? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या