पानसवाडी येथे साथीच्या आजारांचे थैमान

jalgaon-digital
1 Min Read

शनीशिंगणापूर |वार्ताहर|Shanishinganapur

नेवासा तालुक्यातील पानसवाडी येथे घरोघरी थंडी, ताप, सर्दी, खोकला, चिकूनगुण्या व डेंगू अंगदुखी यासारख्या साथीच्या आजाराने थैमान घातले असून ऐन सणासुदीला मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याची भीती असून आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गावातून होत आहे .

रोजच पाऊस पडत आहे, ऊन नाही,दिवसभर ढगाळ वातावरण, गारवा,गरमटपणा,अशा विचित्र हवामानामुळे सर्वत्र विविध प्रकारच्या आजाराने नागरिक हैराण झाले आहेत. आरोग्य अधिकारी, सेविका यांनी पाठ फिरविल्याने भविष्यात या भागात आरोग्याचा प्रश्न धोक्यात येण्याची शक्यता पानसवाडी येथील शंकरराव जगताप यांनी व्यक्त केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *