Saturday, April 27, 2024
Homeनगरपानोडी सोसायटीवर ना. थोरात गटाचे निर्विवाद वर्चस्व

पानोडी सोसायटीवर ना. थोरात गटाचे निर्विवाद वर्चस्व

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

सन 1926 साली स्थापन झालेल्या सहकार क्षेत्रातील सर्वात जुन्या अशा संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील पानोडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाने बिनविरोध एका जागेसह 13 जागांवर दणदणीत विजय मिळवून आपले वर्चस्व राखल्याने सामाजिक, सहकार, राजकीय व सर्व सामान्यांकरिता योगदान देणार्‍या स्व.शिवाजीराव थोरात यांना खर्‍याअर्थाने विजयाची श्रद्धाजंली ठरली आहे.

- Advertisement -

गेल्या अनेक वर्षांपासून संस्थेच्या 4 ते 5 निवडणुका अटीतटीने झाल्याचे चित्र दिसले. मात्र, या संस्थेवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व शेतकी संघाचे चेअरमन शिवाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचे वर्चस्व राहिले. या निवडणुकीत संगमनेर दूध संचालक विक्रम थोरात, माजी उपसरपंच विनायकराव थोरात, सरपंच गणपत हजारे, सोसायटीचे चेअरमन बबनराव कराड, माणिरकराव पाबळ, शरदराव जाधव, सूर्यभान थोरात, आबासाहेब जाधव, बाळासाहेब तळेकर, दिनकर कदम आदींसह कार्यकर्त्यांनी विजयासाठी परिश्रम घेतले.

विजयी उमेदवार पुढील प्रमाणे- सर्वसाधारण – बबन कराड (288), विनायकराव थोरात (316), कारभारी जाधव (300), विठोबा जाधव (301), मधुकर ढोणे (291), भाऊसाहेब तळेकर (297), रावसाहेब हजारे (290), कारभारी साबळे (297), अनु. जाती-जमाती-भाऊसाहेब मुन्तोडे (292), महिला राखीव -नवसाबाई खैरे (290), पुष्पा पाबळ (293), वि.जा / म.भ / वि मा. प्रवर्ग – नामदेव सानप (314) तर इतर मा. प्रवर्ग – आप्पासाहेब खेडकर (बिनविरोध) असून निवडणूक अधिकारी ए. एस. शेख तर सहाय्यक प्रविण आढाव, प्रकाश कडलग, मोहन पवार, मुकुंद सातपुते, राजेश जोशी, भाऊसाहेब तांबे, विलास जोधळे, भिमराज वर्पे, कृष्णा बस्ते, बाबासाहेब वरपे, बाबासाहेब भवर, चतुरे यांनी काम पाहिले.

सर्व विजयी उमेदवारांचे ना. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, अ‍ॅड. माधवराव कानवडे, सौ. दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, सत्यजित तांबे, रणजितसिंह देशमुख, बाबासाहेब ओहोळ, गणपतराव सांगळे, विजय हिंगे, विनायकराव थोरात, राजेंद्र चकोर आदींसह विविध पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

गेली अनेक वर्षे स्व. शिवाजीराव थोरात यांनी निःस्वार्थी व प्रामाणिकपणे लोकांची विकासात्मक कामे केली. हा सोसायटीचा विजय त्याचेच प्रतिक असून भविष्यात कार्यकर्त्याला बळ देऊन सहकारी संस्था मजबूत करून लोकांना विकासाच्या प्रवाहात आणणार आहोत.

– विनायक थोरात

- Advertisment -

ताज्या बातम्या