Friday, April 26, 2024
Homeधुळेपांझरा नदीच्या सफाई मोहिमेस सुरुवात

पांझरा नदीच्या सफाई मोहिमेस सुरुवात

धुळे । प्रतिनिधी Dhule

माझी वसुंधरा अभियानातंर्गत महापालिकेतर्फे पांझरा नदी स्वच्छता अभियानाला आज सुरुवात झाली. शहराच्या मध्य भागातून पांझरा नदी प्रवाहित होते.

- Advertisement -

पावसाळयाचे काही दिवस या नदीत पाणी प्रवाहित असते. परंतु इतर काळ या नदीत नाल्याचे पाणी वाहत असते. तसेच शहरातील बहुसंख्य व्यावसायीक हे कचरा नदीपात्रात टाकतात. त्यामुळे सद्यःस्थितीत नदी पात्राची अत्यंत दुरावस्था झालेली आहेे.

तसेच जिम्पेक्स बायो टेक्नॉलॉजी या खाजगी कंपनीने भारतातील काही नदी स्वच्छता करण्यासाठी केंद्र शासनाला प्रस्ताव सादर केलेला आहे. त्याअंतर्गत धुळे महापालिकेसाठी नदी स्वच्छता करण्यासाठी 548.55 कोटीचा प्रस्ताव प्रस्तावित आहे. त्यास केंद्र शासन लवकरच मंजुरी देण्याची शक्यता आहे.

नुकतीच महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये सभापती आपल्या दारी ही मोहिम राबविण्यात आलेली आहे. शासनाने माझी वसुंधरा योजनेअंतर्गत विविध कामे करण्याबाबत सर्व महापालिकांना आदेशीत केलेले आहे.

त्याअनुषंगाने शहरातील सर्व स्वयंसेवी संघटना, सामाजिक संघटना, रोटरी क्लब, रोटरॅक्ट क्लब, विविध एनजीओ, एसआरपीएफ विभाग, पोलिस विभाग तसेच शहरातील सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करुन त्यांचे सहकार्याने संपुर्ण सप्ताहात शहरातील पांझरा नदी स्वच्छता मोहिम त्वरीत राबविण्याची कार्यवाही सुरु आहे. त्याअनुषंगाने आजपासुन दि.18 फेब्रूवारी पर्यत शहरातील पांझरा नदीपात्र साफसफाई करण्याची मोहिम सुरु करण्यात आली.

आज कुमारनगर नविन पुल ते गणपती मंदिर पर्यंतचे नदीपात्र ते साईबाबा मंगल कार्यालय पुल ते सिध्देश्वर हॉस्पीटल पर्यंतचे नदिपात्रात दोनही बाजुस सफाई मोहिम सुरु करण्यात आली. या मोहिमेप्रसंगी नगसेवक हर्षकुमार रेलन, नगरसेविका किरणताई राकेश कुलेवार, कशिश गुलशन उदासी, सामाजिक कार्यकर्ते राकेश कुलवार, गुलशन उदासी, निलेश खेडकर, मनपा सहा. आरोग्याधिकारी लक्ष्मण पाटील, चंद्रकांत जाधव तसेच सर्व स्वच्छता निरीक्षक व सफाई कामगार उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या