Sunday, April 28, 2024
Homeनगर16 ऑगस्टपासून जिल्ह्यात चांगला पाऊस

16 ऑगस्टपासून जिल्ह्यात चांगला पाऊस

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

16 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या कालावधीत नगर जिल्ह्यात चांगला पाऊस पडेल. ज्या वर्षी पुर्वेकडून पाऊस येतो, त्यावेळी उत्तर महाराष्ट्रात उशीरा पाऊस पडतो. परतीचा पाऊस चांगला होतो, उशीरा 24 जूनला आलेला पाऊस 24 आक्टोबर ला जाईल. असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

तालुक्यातील अस्तगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात पंजाबराव डख बोलत होते. येत्या तीन महिन्याचा अंदाज व्यक्त करताना डख म्हणाले, 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या कालखंडात पाऊस पडेल. 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर, 15 आक्टोबर ते 30 आक्टोबर या कालखंडात पाऊस पडेल. यंदा दिवाळीतही पाऊस पडण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. थंडी 26 आक्टोबर पासुन पडेल.

जून मध्ये देशातील अनेक तज्ञांनी दुष्काळ पडेल असे सांगितले होते. मात्र परिस्थीत वेगळीच झाली. 35 राज्यापैकी 28 राज्यांत 13 टक्के जास्त पाऊस झाला. म्हणजे यावर्षी दुष्काळी परिस्थीती राहाणार नसल्याचे भाकितही त्यांनी व्यक्त केले. शेतकर्‍यांनी घाबरून जावु नये. कमी दिवसात जास्त पाऊस होईल, तळे भरुन जातील. पावसाचा अंदाज शेतकरीही वर्तवू शकतात हे सांगताने ते म्हणाले, गेल्या 5 वर्षापासुन पाऊस 7 जून ला सुरु होणारा पाऊस 22 दिवस पुढे सरकला आहे. त्यामुळे थंडीही 22 दिवस पुढे ढकलली. उन्हाळ्याची हीच स्थिती. 7 जून मध्ये 22 मिळविले की, तुमची पेरणी 28 जून च्या पुढे होईल. हे कायमचे लक्षात घ्या, महाराष्ट्रात 10 ते 15 जुलै दरम्यान चांगला पाऊस पडतो. व 27, 28 जून ला देखील पाऊस पडला. 18 व 19 जूलैला महाराष्ट्रात दरवर्षी 80 टक्के गावात पाऊस पडतो. सप्टेंबरात 16 ते 19 या तारखांनाही चांगला पाऊस होतो. 2 डिसेंबर ते 6 डिसेंबर या दरम्यान अवकाळी पाऊस पडतो.

मागील चार वर्षात नगर जिल्ह्यात संगमनेर भागात चांगला पाऊस पडला तो पुर्वेकडील पावसामुळे, यावर्षीही पुर्वेकडूनच पाऊस आहे. आणखी अडीच महिने पाऊस आहे. त्यामुळे अडीच महिन्यात भरपाई निघून जाणार आहे. सोयाबीनला फुल लागली, थोडा ताण हवाच, जास्त फुले असली की उतारा चांगला मिळेल.

निसर्गाच्या गोष्टीवरुन पाऊस कसा ओळखावा याविषयी बोलतांना पंजाबराव डख म्हणाले, तांबडं आभाळ झाले तर तीन दिवसात पाऊस येईल. घरातील लाईट वर किडे पाकोळ्या आल्या तर समजायचे तीन दिवसात पाऊस येईल. जून मध्ये उभे वारे सुटले तर झाडांवर चिमण्या असतात. या चिमण्या ज्या ठिकाणी धुळ असेल तेथे आंंगोळ करतात. हे धरण पुर्ण भरण्याचे संकेत असतात. गावातील मंदिरात काकडा अभंग होत असेल त्याचा आवाज शेजारच्या गावात गेला की सकाळी 9 वाजता पाऊस पडेल असा अंदाज असतो. शेतावरुन जाणार्‍या विमानाचा आवाज आला तर तीन दिवसात पाऊस येतो, याचे शास्त्रीय स्पष्टीकरण डख यांनी दिले.

बिबव्याच्या झाडाला जास्त फुले आली तर दुष्काळ मानला जातो. ज्या वर्षी चिंचेच्या झाडाला खुप चिंचा लागल्या त्यावर्षी शेतकर्‍यांना मालामाल करणारे वर्ष असते. जांभुळ मे महिन्यात पिकले, तर यंदा पेरणी लवकर होणार, गावरान आंबा शेतकर्‍यांना पावसाचा अंदाज देतो, ज्या वर्षी खुप आंबे लागले, तर पाऊस कमी पडण्याचे संकेत असतात. यंदा वादळाने फुलवारा पडला, आंबे कमी लागतील म्हणुन यंदा पाऊस जास्त असणार. गारपिट ही 22 फेब्रुवारी ते 10 मार्च या कालावधीत दरवर्षी महाराष्ट्रात गारपिट होणार हे नक्की असते. ही सगळीकडे होत नाही. कॅनालच्या, नदीच्या, तळे असेल त्यांच्या एक किमी परिघात गारपिट होते. काळ्या कुट्ट आभाळात फुलकोबीच्या आकाराच्या पांढरे ढग दिसतात त्यावेळी गारांची शक्यता असते.

- Advertisment -

ताज्या बातम्या