Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedआयारामांमुळे सेनेतील इच्छुकांना धडकी

आयारामांमुळे सेनेतील इच्छुकांना धडकी

नाशिक | रवींद्र केडिया | Nashik

महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) तोंडावर सत्ताधारी भाजपतील (bjp) अनेक नगरसेवक (corporator) शिवसेनेच्या (shiv sena) गळाला लागून एक शिवबंधन बांधत असताना गेल्या काही वर्षांपासून माध्यमातून प्रभागात महापालिका निवडणुकीची (Municipal elections) तयारी करणार्‍या शिवसेनेच्या इच्छुकांना यामुळे धडकी भरू लागली आहे.

- Advertisement -

शिवसेनेकडून (shiv sena) भलेही आयारामांना आगामी निवडणुकीची उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आले नसले तरी विद्यमान नगरसेवकांना प्राधान्य देण्याचे सर्वच पक्षांचे आजवर धोरण राहिल्याने शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा इच्छुकांनी सोडून देत नाराजी व्यक्त केली आहे.

सेनेचे सबुरीचे धोरण

ऐन निवडणुकीच्यावर आयारामांचा होत असलेला पक्ष प्रवेश व त्यातून इच्छुकाची वाढलेली घालमेल नाराजी पाहता सेनेच्या नेत्यांनी आता काहीशी सबरीचे धोरण स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे पक्षाच्या नेत्याने सांगितले. पक्षात प्रवेश करणाची संख्या मोठी असली तरी त्यातून पक्षाच्या डावलले जाणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या