Thursday, April 25, 2024
Homeनगरपांढरीपूल येथील महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

पांढरीपूल येथील महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

सोनई |वार्ताहर| Sonai

नेवासा तालुक्यातील पांढरीपूल येथील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गावातीलच दोघांवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत सोनई पोलीस ठाण्यात महिलेने फिर्याद दिली की, दि. 14 ऑक्टोबर रोजी पती व मुलगा गावी गेलेले असताना गावातील महेश कारभारी कर्डिले व योगेश कारभारी कर्डिले घरी येऊन लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या फिर्यादीवरून महेश कर्डिले व योगेश कर्डिले यांच्यावर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 337/2022 भारतीय दंड विधान कलम 354 (अ) (ब), 452, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र लबडे पुढील तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या