Wednesday, April 24, 2024
Homeधुळेनंदाळे येथे पिकांचे पंचनामे सुरू

नंदाळे येथे पिकांचे पंचनामे सुरू

धुळे – तालुक्यातील नंदाळे बुद्रूक येथे काल पहाटे सोडतीन वाजेच्या सुमारास ढगफुटी सदृष्य पाऊस झाला. त्यामुळे गावातील नाल्याच्या पुराचे पाणी गावासह शेतशिवारात शिरल्याने पिकांसह शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले. आज कृषीमंत्री दादा भुसे यांच्या आदेशानंतर सकाळी महसूलच्या पथकाने नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरूवात केली. दिवसभरात 60 ते 70 शेतकर्‍यांच्या नुकसानीची पंचनामे करण्यात आले.

नंदाळे बुद्रूक येथे काल पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास अतिवृष्टी झाली. सुमारे दीड ते दोन तासा झालेल्या अतिवृष्टीमुळे गावातील गावातील ब्रिटीशकालीन तलावा ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे साप नाल्याला मोठा पुर आला. नाल्याचे पाणी गावासह शेत शिवारात शिरले. त्यामुळे सुमारे 80 ते 90 शेतकर्‍यांच्य शेतीसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खळ्यांमध्येही पाणी शिरल्यााने चार्‍याचेही नुकसान झाले. तसेच काही घरांचीही पडझड झाली आहे. तर नाल्याच्या पुरात एक बैलगाडी देखील वाहुन गेली.

- Advertisement -

दरम्यान पहाटेच्या वेळेस गाढ झोपेत असतांना अतिवृष्टीमुळे गावात पाणी शिरल्याने त्यात वीज प्रवाह देखील खंडीत झाल्याने ग्रामस्थांची धावपळ उडाली होती. या अतिवृष्टीमुळे गावात दोन वर्षापुर्वी झालेल्या ढगफुटीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

दरम्यान शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकर्‍यांनी त्वरीत पंचनामे करण्याची मागणी केली. काही शेतकर्‍यांनी बोरकुंडचे लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे यांची भेट घेतली. त्यांनी थेट कृषीमंत्री दादा भुसे यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच माहिती दिली. त्यानंतर ना. दादा भुसे यांनी जिल्ह्यातील अधिकार्‍यांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यनुसार आज सकाळीच महसूल विभागाच्या पथकाने गावात दाखल झाले. पथकाने गावात नुकसानीची पाहणी केली. तसेच शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले. सायंकाळपर्यंत 60 ते 70 शेती पिकांचे पंचनामे करण्यात आले होते. पंचनामे करून त्वरीत नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या