Thursday, April 25, 2024
Homeधुळेपंचायत समितीच्या लिपिकाकडे धाडसी घरफोडी

पंचायत समितीच्या लिपिकाकडे धाडसी घरफोडी

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

देवपूरातील विघ्नहर्ता कॉलनीत राहणाऱ्या धुळे पंचायत समितीच्या महिला लिपिकाकडे चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली. रोख रकमेसह सोन्या-चांदीचे असा एकूण सुमारे दहा ते बारा लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी देवपूर पश्चिम पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

- Advertisement -

विघ्नहर्ता कॉलनी धुळे पंचायत समिती येथे हे क्लार्क या पदावर कार्यरत असलेल्या श्रीमती ललिता शिवाजी बदाणे या राहतात. त्या दि. 12 ऑगस्ट रोजी पिंपरी, एरंडोल येथे गेल्या होत्या. आज दुपारी घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे समजले.

चोरट्यांनी घरातील मागच्या दारुन खिडकीतून प्रवेश करून सुमारे दहा ते अकरा लाखांचा ऐवज लंपास केला आहे. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी सचिन हिरे, पश्चिम पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मैनोद्दीन शेख व त्यांचे पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.तसेच ठसे तज्ञांना यावेळेस पाचारण करण्यात आले होते.

यावेळी श्रीमती ललिता बदाणे यांनी सांगितले की, घरातील पाच तोळ्याची सोन्याची माळ, पाच तोळे सोन्याच्या बांगड्या, पाच ग्राम सोन्याचे कानातले, पाच ग्रॅमचे एक तोळ्याची अंगठी, किरकोळ एक तोळे सोने, वीस भार चांदीच्या साखळ्या, पाच भार चांदीच्या साखळ्या, चांदीचे ब्रेसलेट तसेच दोन लाख रुपये चोरांनी लंपास केल्या आहेत. याबाबत देवपुर पश्चिम पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या