Saturday, April 27, 2024
Homeनगरसात पंचायत समिती सभापतीपद खुल्या वर्गासाठी

सात पंचायत समिती सभापतीपद खुल्या वर्गासाठी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आरक्षणा पाठोपाठ राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीची तयारी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून 10 जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती पदाचे चक्रीय पध्दतीने आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. लवकर प्रत्यक्षात नगर जिल्ह्यात कोणत्या पंचायत समितीच्या सभापतीपदावर कोणते आरक्षण असणार आहे, हे कळविण्यात येणार असल्याचे ग्रामविकास विभागाकडून पत्राव्दारे कळविण्यात आले आहे.

- Advertisement -

नगर जिल्ह्यात 14 पंचायत समितीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी 4 आणि खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी 2 सभापती आरक्षित राहणार आहे. ग्रामविकास विभगाचे कक्ष अधिकारी सुनील माळी यांनी याबाबत पत्र दहा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना पाठवल आहे. यात अहमदनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, नाशिक, धुळे, जळगाव आणि पुणे जिल्ह्यांच्या समावेश आहे. माळी यांच्या पत्रात जिल्हा परिषद अध्यक्ष पद आणि पंचायत समिती सभापती आरक्षण, तसेच निवडणूक नियम 1962 च्या नियम 2 अ, 2 ब, 2 क आणि 2 ड च्या तरतुदीनूसार राज्यातील 34 जिल्हा परिषदेच्या अतंर्गत येणार्‍या 351 पंचायत समिती सभापती आरक्षण सोडतीची कार्यवाही 4 ऑक्टोबर 2022 पासून सुरु करण्यात आली आहे.

हे आरक्षण सोडत झाल्यावर ते राजपत्रात प्रसिध्द केल्यानंतर संबंधीत जिल्ह्याला कळविण्यात येणार आहे. यानूसार नगर जिल्ह्यात अनुसूचित जातीसाठी 1, अनुसूचित जाती महिलांसाठी 1, अनुसूचित जमातीसाठी शुन्य, अनुसूचित जमाती महिलांसाठी 1, ओबीसीसाठी 2 आणि ओबीसी महिलांसाठी 2 तर खुल्या प्रवर्गासाठी 4 आणि खुल्या महिला प्रवर्गासाठी 4 असे 14 तालुक्यातील पंचायत समितीसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. हे आरक्षण सोडत काढून ते राजपत्रात प्रसिध्द केल्यानंतर संबंधीत जिल्ह्यांना कळविण्यात येणार असल्याचे माळी यांच्या पत्रात नमुद करण्यात आलेले आहे.

आरक्षण काढणार कोण आतापर्यंत पंचायत समिती पदाचे आरक्षण हे जिल्हाधिकारी काढत होते. मात्र, ग्रामविकास विभागाचे कक्षाधिकारी माळी यांच्या पत्रात हे आरक्षण मुंबईला ग्रामविकास विभाग की संबंधीत जिल्हाधिकारी हे काढणार याबाबत स्पष्टता नाही. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे विचारण केली असता, प्रत्यक्षात सोडत कोण काढणार याबाबत स्पष्टपणे सांगता आले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या