Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याPhoto Gallery : अभूतपूर्व प्रतिसादात 'देशदूत पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो'ची सांगता

Photo Gallery : अभूतपूर्व प्रतिसादात ‘देशदूत पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो’ची सांगता

नाशिक | प्रतिनिधी Nashik

पंचवटी व परिसरातील नागरिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने तीन दिवसांपासून सुरू असलेल्या ‘पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो’ ( Panchavati Property Expo )चा शानदार समारोप करण्यात आला.

- Advertisement -

शुक्रवारी सुरू झालेल्या प्रदर्शनाच्या तीनही दिवस पंचवटीवासीयांनी विविध बांधकाम व्यावसायिकांच्या स्टॉलला भेट देऊन स्वगृहस्वप्नपूर्तीच्या दिशेने आश्वासक वाटचाल केली. प्रदर्शनाच्या अखेरच्या दिवशी अनेक नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देत रविवारची सायंकाळ ‘देशदूत’ परिवारासोबत घालवली. मध्यमवर्गीयांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रशस्त मार्ग खुल्या करणाऱ्या ‘देशदूत पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो’ प्रदर्शनाच्या तीन दिवसांत बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यांच्यात महत्त्वपूर्ण दुवा म्हणून ‘देशदूत’ वठवत असलेली भूमिकाही ग्राहकांना मोठ्या प्रमाणात भावली.

मान्यवरांची भेट

माजी नगरसेवक जगदीश पाटील, नावाचे संस्थापक अध्यक्ष, मोतीराम पिंगळे, नावाचे अध्यक्ष प्रवीण चांडक, दिलीप निकम, नितीन राका, मिलिंद कोल्हे पाटील आदी मान्यवरांनी प्रदर्शनास भेट देऊन स्टॉलधारकांशी संवाद साधला तसेच मध्यमवर्गीयांच्या स्वप्नपूर्तीसाठी आयोजकांकडून होत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

ग्राहकांच्या प्रतिक्रिया:

सद्यस्थितीत बांधकाम व्यवसायाबाबत महत्वपूर्ण माहिती मिळण्यास एक्स्पोची भूमिका महत्त्वाची वाटली. घर व त्यासंबंधीचे पूरक पर्याय या प्रदर्शनाच्या माध्यमातून एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्याने गृहस्वप्नपूर्तीची प्राथमिकता शक्य झाली आहे.

निशा पवार

ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यात योग्य समन्वय साधण्यासाठी ‘देशदूत’ने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. यामुळे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाहिले पाऊल टाकण्यात खूप मदत मिळाली त्याबद्दल देशदूत चे आभार व्यक्त करते.

उषा गांगुर्डे

नेटके आयोजन होते त्यामुळे कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती मिळण्यास मदत झाली. एक्स्पो मधील काही प्रकल्प बजेटप्रमाणे तसेच जसे अपेक्षित होते तसे वाटल्याने आम्ही तिथे भेट देणार आहोत. ‘देशदूत’चे मनःपूर्वक आभार.

मनोज जगताप

एक ठराविक एरिया डोळ्यासमोर ठेऊन या एक्सपोचे आयोजन करण्यात आले होते. येथे सहकुटुंब नागरिकांनी हजेरी लावली खरोखरच त्यांना याचा फायदा झाला. ग्राहकांकडून मिळालेला प्रतिसाद उत्स्फूर्त आणि सकारात्मक असल्याने एक्स्पो १००% यशस्वी झाला आहे.

स्टॉल धारक

प्रॉपर्टी एक्सपोचे यश

तीन दिवसीय एक्स्पोमध्ये क्रीश ग्रुपचे एक शॉप, श्रीनिवास डेव्हलपर्सचे एक रो हाऊस तसेच ऋषीराज रियल्टर्सच्या एक फ्लॅटची बुकिंग करण्यात आली. याशिवाय शेकडो ग्राहकांनी चौकशी करून गृह व व्यावसायिक प्रकल्प खरेदीस रुची दाखवली. भेट देणाऱ्यांनी तोंडभरून प्रॉपर्टी एक्स्पोबद्दल गौरवोद्गार काढले.

बांधकाम व्यावसायिक संस्थांसह गृहोपयोगी संस्थांचे मिळून सुमारे ३० स्टॉल्स प्रदर्शनात मांडण्यात आले होते. तीन दिवसांत लकी ड्रॉच्या माध्यमातून संस्कृती पैठणीकडून रोज २ पैठण्या आणि टकले ज्वेलर्स यांच्या वतीने रोज ३ चांदीचे नाणे भेट देण्यात आले. जे ग्राहक उपस्थित नव्हते त्यांनी येत्या ७ दिवसाच्या आत म. गांधी रोड येथील दै. ‘देशदूत’च्या कार्यालयात संपर्क साधून ओळखपत्र दाखवून आपले बक्षिसे घेऊन जाण्याचे आवाहन देशदूत तर्फे करण्यात आले.

लकी ड्रॉ विजेते

संस्कृती पैठणीतर्फे बक्षिसे :

एम. जी. भामरे

मनीषा जोशी

टकले ज्वेलर्सतर्फे बक्षिसे :

सोनाली विक्रम खैरनार

विजय कोठावदे

चेतन विसपुते

- Advertisment -

ताज्या बातम्या