Sunday, April 28, 2024
Homeनगरपल्लवी मेहेर यांना पोलीस उपअधिक्षकपदी पदोन्नती

पल्लवी मेहेर यांना पोलीस उपअधिक्षकपदी पदोन्नती

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

येथील रहिवासी सौ.पल्लवी रोहित मेहेर यांची पोलीस उपअधिक्षक पदी पदोन्नती होऊन गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) पुणे येथे नियुक्ती झाली आहे.

- Advertisement -

जैन समाजातील महिलेने पोलीस खात्यात महत्वाचे पद मिळवणे ही समाजाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट असून महाराष्ट्रात ही जैन समाजातील पहिली महिला आहे, असे जैन संघटनेचे तारुशेठ भंडारी व विलास गांधी यांनी सांगितले.

सौ. मेहेर या येथील प्रसिध्द व्यापारी तखतशेठ मेहेर यांच्या स्नुषा व चार्टर्ड अकौंटंट रोहित मेहेर यांच्या पत्नी आहेत. या नियुक्तीबद्दल त्यांचे आ. मोनिका राजळे, माजी आ. चंद्रशेखर घुले, विजय जोशी यांनी अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या