Saturday, April 27, 2024
Homeनाशिकत्र्यंबकेश्वरला पालखी मिरवणूक; गर्दी टाळण्याचे आवाहन

त्र्यंबकेश्वरला पालखी मिरवणूक; गर्दी टाळण्याचे आवाहन

त्र्यंबकेश्वर । प्रतिनिधी Trimbakeshwar

येथे गुरुवारी होणाऱ्या रथोत्सवाला Chariot festival शासनाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे परंपरेने पालखी Palkhi procession काढण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. पालखी मिरवणूक जेव्हा निघेल तेव्हा नागरिकांनी मार्गावर गर्दी करण्याचे टाळावे, असे आवाहन त्र्यंबक देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisement -

ट्रस्टने दुपारी 4 ते सायंकाळी आठ या वेळेत पालखी काढण्याचे नियोजन केले आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्देश लक्षात घेवून सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टने केले आहे. रात्री 10 ते एक या वेळेत वैकुंठचतुर्दशीची महापूजा त्र्यंबकेश्वर मंदिरात होणार आहे. हरिहर भेट सोहळा होईल. मंदिर अंतर्गत पूजन होईल, असे ट्रस्टकडून सांगण्यात आले.

दरम्यान कार्तिकी पौर्णिमानिमित्ताने दरम्यान उत्सवाकरता पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. तर नगरपालिकेने मेनरोड गंगा स्लॅबवर इ टपर्‍या उत्सवा करता काढून घ्यावा, आवाहन केले आहे.

त्र्यंंबकेश्वरला 1 तास पाऊस

येथे बुधवारी सकाळीे पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या. सुमारे एक तास पाऊस झाला. या पावसाने जमिनीत ओलावा वाढला आहे. त्याचा रब्बी हंगामासाठी उपयोग होणार आहे . दरम्यान पालखी मिरवणुकीत पावसाने विघ्न आणू नये ही चर्चा होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या