Thursday, April 25, 2024
Homeनाशिकपालखेड रस्ता डांबरीकरणच्या प्रतीक्षेत?

पालखेड रस्ता डांबरीकरणच्या प्रतीक्षेत?

पालखेड बं. । बापू चव्हाण | Palkhed

दिंडोरी (dindori) – पालखेड बंधारा (palkhed dam) या रस्त्याची अतिशय दुरवस्था (poor condition of roads) झाल्याने सध्या या रस्त्याचे तात्पुरते खड्डे (potholes) बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु असे असले तरी या रस्त्याचे डांबरीकरण (Asphalting of road) कधी होणार ? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यात (dindori taluka) गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाने थैमान घातले असून, या पावसामुळे (rain) तालुक्यातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाल्याने वाहनधारकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तालुक्यातील रस्त्यांच्याबाबत दैनिक देशदूतने (deshdoot) अनेक वेळा आपल्या माध्यमातून वृत्त प्रसिद्ध केले. त्यामुळे उशिरा का होईना तालुक्यातील काही रस्त्यांचे काम (road work) सुरू करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी मुरूम टाकून खड्डे (potholes) बुजवण्याचे काम करण्यात येत आहे.

याबाबत नागरिकांनी वाहनधारकांनी अनेक वेळा संबंधित खात्याकडे तक्रार केली असता पावसाचे कारण दाखवून हे कामे रखडवली होती. परंतु आता पावसाने उघडीप देऊनही मंजूर असणार्‍या कामांना सुरुवात होत नसल्याने तालुक्यातील जनतेने नाराजी व्यक्त केली आहे. दिंडोरी ते पालखेड या रस्त्याचे काम कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता महत्त्वाचा मानला जातो या रस्त्यावरून अनेक वेळा अधिकारी लोकप्रतिनिधी ये-जा करत असताना देखील अजूनही या रस्त्यांचे काम (road work) होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत अनेक वेळा दैनिक देशदूतने याची दखल घेऊ याबाबत वृत्त प्रसिद्ध केले असता उशिरा का होईना संबंधित खात्याला जाग येऊन सध्या या रस्त्याचे खड्डे (potholes) बुजवण्याचे काम सुरू असल्याने तात्पुरती मलमपट्टी करून नागरिकांचे वाहनधारकांचे समाधान केले जात आहे. मात्र, या रस्त्यांच्या साईटपट्ट्या व रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण कधी होणार हे मात्र सांगणे कठीण आहे.

पालखेड गाव ते कॉलनी या रस्त्याचे सध्या खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले होते. मात्र झालेल्या पावसा लने पुन्हा या रस्त्याची अवस्था जैसे थे अशी झाली आहे. या अशा मलम पट्ट्या अनेक वेळा करण्यात आल्या परंतु त्याचा काहीच उपयोग होत नाही या पावसाने हा रस्ता पुन्हा एकदा खड्डेमय झाल्याने या रस्त्याचे डांबरीकरण करून साईट पट्ट्यांचे काम करावे.

– सचिन गायकवाड, शेतकरी पालखेड बंधारा

- Advertisment -

ताज्या बातम्या