Thursday, April 25, 2024
Homeनाशिकपालखेड धरण भरले; कादवा नदीपात्रात होतोय विसर्ग

पालखेड धरण भरले; कादवा नदीपात्रात होतोय विसर्ग

ओझे | वार्ताहर

दिंडोरी तालुक्यात आज दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. संततधार पावसाने नदी नाल्याना पूर आल्यामुळे पालखेड धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. परिणामी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

- Advertisement -

आज धरणातून कादवा नदी पात्रात दहा हजार पाचशे क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

त्याप्रमाणे दिंडोरीच्या तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये ही पावसाचा जोर वाढत असल्यामुळे पालखेंड धरणातून अजून विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे.

याबाबतची माहिती पालखेंड शाखा अभियंता सानप यांनी देशदूतशी बोलताना दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या