Saturday, April 27, 2024
Homeनगरपालिकेची सर्वसाधारण सभा वेब पोर्टलवर नव्हे प्रत्यक्ष सभागृहात घ्या

पालिकेची सर्वसाधारण सभा वेब पोर्टलवर नव्हे प्रत्यक्ष सभागृहात घ्या

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव पालिकेची सर्वसाधारण सभा वेब पोर्टलवर आयोजित करण्यात आली होती. मात्र नेटवर्क व तांत्रिक अडचणीमुळे

- Advertisement -

शहरातील प्रलंबित प्रश्न व नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चर्चा घडवून ती सोडविण्यासाठी सदरच्या सभेतील सर्व विषय पुन्हा आठ दिवसांनी सभागृहात घेण्यात यावेत, अशी मागणी भाजप व शिवसेना नगरसेवकांनी नगराध्यक्ष व मुख्यधिकार्‍यांकडे केली.

मात्र नगराध्यक्ष व पालिका प्रशसनाने सभेचे कामकाज पुढे चालू ठेवल्यामुळे भाजप शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभेतील विषयाचे अभिप्राय पत्राव्दारे देऊन त्याची नोंद सभेच्या इतिवृत्तामध्ये करण्याची मागणी केली.

भाजपचे गटनेते रवींद्र पाठक व शिवसेनेचे गटनेते योगेश बागुल यांनी दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे, मागील सभेचे इतिवृत्त नगरपरिषदेकडून न मिळाल्याने ते प्राप्त झाल्यावर त्यावर मत प्रकट केले जाईल. आस्थापना विभागाकडून स्वेच्छनिवृत्ती बाबत आलेल्या अर्जाचा विचार करता स्वेच्छानिवृत्ती देताना सक्षम वैद्यकीय अधिकार्‍याचा दाखला व त्यांच्या वयाचा विचार व्हावा.

करोना संसर्गजन्य आजाराचा फैलाव पाहता शहरातील मिळकतीचे तूर्त फेर मूल्यांकन न करता त्यावर नंतर विचारविनिमय करावा. भविष्यात नगर मनमाड हायवे चारपदरी होणार असल्याने तदनंतरच सेंट्रल लाईन व स्ट्रीट लाईट, हायमास्ट बसविण्याचा विचार व्हावा. जुन्या घंटागाड्यांवर किती खर्च झाला व ठेकेदारांकडून भाडेपोटी किती रक्कम मिळाली.

वाहतुकीसाठी घंटागाडी ठेकेदारानेच घ्यावी व त्याचा खर्चही ठेकेदाराने करावा. गायत्री कन्स्ट्रक्शनने तलावाच्या जागेवरील 15 कोटी किंमतीची माती व मुरूम समृध्दी रस्त्यासाठी मोफत उचलली. त्यामुळे तलावाच्या बांधकामासंदर्भात गायत्री कन्स्ट्रक्शनसोबत चर्चा करावी. साठवण तलाव क्र. 5 च्या बांधकामाकरिता प्रकल्प सल्लागार नेमण्याकरिता निविदा प्रसिध्द केली होती.

त्यावर 4 निविदा पालिकेस प्राप्त झाल्या. मात्र परस्पर मानव सेवा कन्सलटन्ट धुळे यांना तांत्रिक सल्लागार म्हणून नेमणे योग्य होईल, असे बांधकाम अभियंत्यांनी नमुद केले आहे. तलाव क्र. 5 चे बांधकाम हा विषय जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने त्यावर सविस्तर प्रत्यक्ष चर्चा होणे आवश्यक आहे.

तलाव क्र. 5 व 49 कोटीची पाणीपुरवठा योजना यावर सविस्तर विचारविनिमय करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष नगरपालिकेच्या सभागृहात सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून बोलविण्यात यावी. नगरसेवकांना कामे सुचिवण्याकरिता वेळ देऊन त्यांच्याकडून प्रभागातील कामांची लेखी यादी घेऊन प्रस्ताव तयार करावा. ऑनलाईन मिटींग चालू झाल्यावर अभिप्राय प्रकट केले जाईल. हे अभिप्राय भाजप सेनेच्या नगरसेवकांनी लेखी पत्राव्दारे पालिकेत सादर केले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या