Thursday, April 25, 2024
Homeजळगावपाळधी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कंट्रोल जमा

पाळधी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कंट्रोल जमा

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

पाळधी येथील पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबलने लाच घेतल्याचे प्रकरण पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरिक्षक हनुमंत गायकवाड यांचा भोवले असून त्यांची याप्रकरणात मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली आहे.

- Advertisement -

अपघातातील वाहन सोडण्यासाठी वाहन मालकाकडून पंधरा हजाराची लाच घेतांना सुमित संजय पाटील या पोलीस कॉन्स्टेबलला लाचलुचतप प्रतिबंधक विभागाने 11 जानेवारी रोजी अटक केली.

सुमीत पाटील हा सहाय्यक पोलीस निरिक्षक गायकवाड यांचा रायटर होता. रायटरने लाच घेतल्याने पाळधी दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांना पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी मंगळवारी नियंत्रण कक्षात जमा केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या