Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशपाकिस्तानची नाचक्की! पैसे दिले नाहीत म्हणून मलेशियाने जप्त केलं प्रवाशी विमान

पाकिस्तानची नाचक्की! पैसे दिले नाहीत म्हणून मलेशियाने जप्त केलं प्रवाशी विमान

दिल्ली | Delhi

पाकिस्तानचा मित्र देश मलेशियाने जोरदार धक्का दिला आहे. मलेशियाने पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे (पीआईए) बोईंग 777 हे विमान जप्त केले आहे.

- Advertisement -

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सची विमाने लीजवर घेण्यात आली होती पण त्यांना पैसे दिले गेले नव्हते. मलेशियाच्या स्थानिक कोर्टाच्या आदेशानुसार हे विमान जप्त करण्यात आले आहे. विमानातील कर्मचारी आणि प्रवाशांचा अपमान करून त्यांना उतरवण्यात आले. पीआयएने मलेशियाच्या या कारवाईला ‘अस्वीकार्य’ असे वर्णन केले आहे.

दरम्यान PIA ने याबाबत ट्विटरवरून माहिती दिली होती. पीआयएने मलेशियन कोर्टावर टीका करणारं ट्वीट केलं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, ‘पीआयएचं विमान मलेशियाच्या स्थानिक कोर्टाने जप्त केले पकडले असून त्यांनी यूके कोर्टात सुरू असणाऱ्या पीआयए आणि एका पक्षाच्या प्रलंबित कायदेशीर वादासंबंधी एकतर्फी निर्णय घेतला आहे. दरम्यान प्रवाशांची काळजी घेण्यात येत असून त्यांच्या प्रवासाची पर्यायी व्यवस्था निश्चित करण्यात आली आहे.’

तसेच, ‘ही एक न स्वीकारता येणारी परिस्थिती आहे आणि पीआयएने पाकिस्तान सरकारकडे मुत्सद्दी माध्यमांद्वारे हे प्रकरण उपस्थित करण्यासाठी मदत मागितली आहे. असेही त्यांनी म्हंटले आहे.

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या ताफ्यात एकूण 12 बोइंग 777 विमान आहेत. या विमानांना वेगवेगळ्या कंपन्यांकडून वेगवेगळ्या वेळी ड्राय लीजवर घेण्यात आले आहे. मलेशियात जप्त झालेले विमान देखील अशाप्रकारे लीजवर घेण्यात आले होते. मात्र या डीलमध्ये असे देखील होते की, पैसे चुकवण्यास PIA असमर्थ ठरल्यास विमान जप्त केले जाईल. क्वालालांपूर मध्ये याच आधारावर PIA चं विमान जप्त करण्यात आलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या