Thursday, April 25, 2024
Homeनगरथकीत कृषी वीजबिलात 50 टक्के सवलत

थकीत कृषी वीजबिलात 50 टक्के सवलत

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

महावितरण कृषी योजना 2020 अंतर्गत थकीत व चालू कृषी विज बिलात भरघोस सवलतीची घोषणा महावितरणकडून करण्यात आली आहे.

- Advertisement -

तसेच ग्रामपंचायतींनी थकीत बिलांची वसुली केल्यास वसूल रकमेच्या 30 टक्के तर शेतीच्या चालू बिलांची वसुली केल्यास वसूल रकमेच्या 20 टक्के रक्कम प्रोत्साहन मोबदला म्हणून देण्यात येणार आहे.

महावितरण कंपनीने कृषी योजना 2020 अंतर्गत नवीन वीज जोडणी, कृषीच्या थकीत व चालू वीज बिलाच्या वसुलीसाठी धोरण जाहीर केले आहे. यामध्ये लघु वाहिनीपासून विविध अंतरावर असलेल्या शेतकर्‍यांना नवीन वीज जोडणी देण्यात येणार आहे. तसेच कृषीच्या थकबाकीत व चालू वीज बिलांमध्येही सूट देण्याचे धोरण जाहीर केले आहे. वीज नियामक आयोगाने मान्यता दिलेल्या खेळत्या भांडवलावरील व्याज दरानुसार आकारणी करून सुधारीत रक्कम काढण्यात येऊन या सुधारीत रकमेच्या केवळ 50 टक्के रक्कम शेतकर्‍यांना भरायची असून उर्वरीत रक्कम माफ होणार आहे.

सुधारीत रक्कम भरण्यासाठी तीन वर्षे म्हणजेच 31 मार्च 2024 पर्यंत विविध सवलती असून मार्च 2022 पर्यंत थकीत बाकी भरल्यास 50 टक्के माफ होणार आहे. तसेच मार्च 2023 पर्यंत भरल्यास 30 टक्के वीज बाल माफ होणार आहे. मार्च 2024 पर्यंत थकीत बाकी भरल्यास बिलात 20 टक्के सवलत मिळणार आहे. तसेच नियमीत शेती वीज बील भरणार्‍यांना 5 टक्के सवलती बरोबर 10 टक्के अतिरीक्त सवलत देण्यात येणार आहे. मात्र सवलत देऊनही वीज बिले न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या योजनेतून वसूल होणार्‍या रकमेपैकी 33 टक्के रक्कम ग्रामंपचायतीमधील नवीन जोडणी, पायाभूत सुविधा, विद्युत प्रणाली सक्षमीकरण, बळकटीकरणासाठी ग्रामपंचायत स्तरावर वापरण्यात येणार आहे. याचबरोबर ग्रामपंचायतींनी वसुलीसाठी पुढाकार घेतल्यास वसूल थकबाकीच्या 30 टक्के रक्कम मोबदला म्हणून दिला जाणार असून चालू वीज बिलातून वसुली रकमेच्या 20 टक्के मोबदला तसेच वीज बील भरणा केंद्र सुरू केल्यास प्रती पावती पाच रुपये मिळणार आहेत. या योजनेमुळे महावितरणची थकीत वसुली होणार असून ग्रामीण भागातील ग्रांमपचायतींना उत्पन्नाचे स्रोतही मिळणार आहे. त्यामुळे कीती ग्रामपंचायती यामध्ये सहभाग घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या