Thursday, April 25, 2024
Homeनगरपाच महिन्यापासून थकलेले वेतन द्या

पाच महिन्यापासून थकलेले वेतन द्या

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या कर्मचार्‍यांच्या वेतन संदर्भात सातत्याने अनियमितता होत असल्याने कर्मचारी वैतागले आहेत. पाच महिन्यापासून कर्मचार्‍यांची वेतन न झाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहेत. त्यामुळे तात्काळ वेतन करा अशी मागणी संबंधित संस्थातील कर्मचार्‍यांनी शासनाकडे केली आहे.

- Advertisement -

राज्यातील संबंधित संस्थेतील कर्मचार्यांच्या वेतनात संबंधित गेल्या दोन वर्षापासून सातत्याने अनियमितता आहे.जानेवारी दोन हजार बावीस पासून येथील कर्मचार्‍यांचे वेतन न झाल्यामुळे कर्मचार्‍यांच्या रेशन पाणी ,मुलांची शैक्षणिक फी, गृहकर्ज, खाजगी कर्ज, आजारपण यासारख्या दैनंदिन खर्च भागवणे देखील कठीण झाले आहेत. त्यामुळे कर्मचारी च्या कुटुंबाची मोठ्या प्रमाणावर आर्थिक व सामाजिक कुचंबणा होत आहे.

सद्यस्थितीत पाच महिन्याचे वेतन न मिळाल्याने कुटुंबाला लागणारे धान्य खरेदी करणे सुद्धा अशक्य झाले आहे. त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून भूक बळी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांचे कुटुंबात भूकबळी होण्यापूर्वीच वेतन करा अशी कळकळीची विनंती निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावरती अजय सलगोंड, आशिष राऊत, सुहास वाघमारे, बळीराम शिंदे, नितीन टिळेकर, कुंदा अभंग, बाळासाहेब रत्ने आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त, जिल्हाधिकारी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष आदिंना पाठविण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या