Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशपद्म विभूषण 'कपिला वात्सायन' यांचे निधन !

पद्म विभूषण ‘कपिला वात्सायन’ यांचे निधन !

दिल्ली | Delhi

कला अभ्यासक, इंदिरा गांधी नॅशनल सेंटर ऑफ आर्ट्सचे संस्थापक संचालिका आणि आयआयसीच्या आजीवन सभासद आणि राज्यसभेच्या मानद खासदार विदुषी कपिला वत्सयन यांचे आज निधन झाले. दिल्ली मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ९१ वर्षाच्या होत्या.

- Advertisement -

कपिला यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात 25 डिसेंबर 1928 मध्ये झाला. डॉ. कपिला वात्सायन यांनी 1946 मध्ये दिल्ली विद्यापीठांतर्गत येणाऱ्या हिंदू कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले.

1948 मध्ये त्यांनी पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांचे शिक्षण दिल्ली बनारस हिंदू विद्यापीठ आणि अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठातूनही झाले. त्याना भारतीय संस्कृती आणि कलेची चांगली जाण होती. कपिला वात्सायन यांच्या आई सत्यवती मलिक या थोर लेखिका होत्या. संगीत नाटक अगादमी फेलो असलेल्या कपिला या प्रख्यात नर्तक शम्भू महाराज आणि प्रख्यात इतिहासकार वासुदेव शरण अग्रवाल यांच्या शिष्या होत्या.

कपिला वात्सायन यांच्या निधनामुळे कला क्षेत्रात दु:खाची लाट निर्माण झाली आहे. कपिला वात्सायन या प्रतितयश कवी सच्चिदानंद हीरानंद वात्सायन यांच्या पत्नी होत. साधारण 1960 मध्ये त्यांनी पतीपासून काडीमोड घेतला. तेव्हापासून त्या एकट्याच राहात होत्या.

इंडिया इटरनॅशनल सेंटरच्या त्या आजीवन सभासद होत्या. त्यांना कला आणि नृत्य क्षेत्रातील अभ्यासक, जाणकार आणि निष्णात माणले जात असे. डॉ. कपिला या केवळ नृत्य विद्वानच नव्हत्या तर त्या भरतनाट्यम, ओडिसी यासोबतच कथ्थक आणि मणिपूर नृत्य आदींमध्येही पारंगत होत्या.

2006 मध्ये त्यांना राज्यसभेचे मानद सदस्य म्हणून निवडण्यात आले. मात्र, लाभ आणि पद या कारणामुळे त्यांना राज्यसभा सदस्यत्वाचा त्याग करावा लागला. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा राज्यसभा सदस्या म्हणून निवडण्यात आले होते.

कपिला वात्सायन या इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या संस्थापक सचीव आणि इंडिया इंटरनॅशनल सेंटरच्या आजीवन ट्रस्टी होत्या. त्यांनी भारती नाट्यशास्त्र आणि भारतीय संस्कृती, परंपरा, कला या विविध विषयांवर गंभीर आणि तितकीच वैवीध्यपूर्ण पुस्तके लिहीली.

- Advertisment -

ताज्या बातम्या