Thursday, April 25, 2024
Homeनगरदिव्यांग कर्मचारी संघटनेचे कार्य परमेश्वरी कार्य

दिव्यांग कर्मचारी संघटनेचे कार्य परमेश्वरी कार्य

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शारीरिक अडचणी, व्याधींशी सामना करून दिव्यांग कर्मचारी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्याचे राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे कार्य हे परमेश्वरी कार्य आहे. त्यांच्या या कार्याला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो, असे गौरवोद्गार पद्मश्री पोपटराव पवार यांनी काढले.

- Advertisement -

राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्या गुणवंत दिव्यांग कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्रीताई घुले, उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अर्थ समितीचे सभापती सुनील गडाख, बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती मीराताई शेटे, संभाजी लांगोरे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

अध्यक्षस्थानावरून बोलताना घुले यांनी दरवर्षी शिक्षक दिनाला आदर्श पुरस्कार देताना एक पुरस्कार दिव्यांग शिक्षकांसाठी आरक्षित ठेऊ, तसेच दरवर्षी जिल्हा परिषदेचे सभागृह 3 डिसेंबरला अपंग कर्मचारी संघटनेसाठी विनामूल्य देऊ, असे आश्वासन संघटनेला दिले. प्रास्ताविकात संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव अनाप यांनी संघटनेने दिव्यांग कर्मचार्‍यांचे वाहन भत्ता, मुख्याध्यापक प्रमोशन, सोयीच्या बदल्या आदी अनेक महत्त्वाचे प्रश्न सोडवलेले आहेत.

यावेळी संघटनेचे मार्गदर्शक दत्तात्रेय जपे, संतोष सरवदे, राजू आव्हाड, पोपट धामणे, राजेंद्र औटी, बन्सी गुंड, उद्धव थोरात, रमेश शिंदे, साहेबराव मले, नारायण लहाने, किरण माने, श्रीकांत दळवी, संजय बोरसे, योगेश भागवत, राजेंद्र ठूबे, गजानन मुंडलिक, अमोल चन्ने, महेंद्र कोळी आदी उपस्थित होते. आभार उद्धव थोरात यांनी मानले तर सूत्रसंचालन विना दिघे यांनी केले.

सुनील मेचकर, शिवाजी आव्हाड, निर्मला काळे, मनीषा पिसे, बप्पासाहेब मरकड, दत्तात्रय हजारे, निलेश कंगे, ईश्वर कणसे, छाया काकडे, भाऊसाहेब सावंत, राधाकिसन शिंदे, दादाभाऊ वायळ, संग्राम राठोड, राजश्री पाटील, महिंद्रा कोळी, प्रवीण रायबोर्डे या 16 दिव्यांग कर्मचार्‍यांना गुणवंत दिव्यांग कर्मचारी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या