Friday, April 26, 2024
Homeनगरपाडव्याच्या दिवशी 8 हजार 290 साईभक्तांनी घेतला समाधीच्या दर्शनाचा लाभ

पाडव्याच्या दिवशी 8 हजार 290 साईभक्तांनी घेतला समाधीच्या दर्शनाचा लाभ

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

राज्य शासनाच्या आदेशाने दिनांक 16 नोव्हेंबरपासून पहाटेच्या काकड आरतीनंतर श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना

- Advertisement -

दर्शनासाठी खुले करण्यात आले असून पहिल्या दिवशी दिवसभरात सुमारे 8 हजार 290 साईभक्तांनी सामाजिक अंतराचे पालन करून श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ घेतला असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली.

श्री. बगाटे म्हणाले, जगभरात, देश व राज्यात आलेल्या करोना व्हायरसच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्यावतीने लॉकडाऊन करण्यात आले असून दिनांक 17 मार्चपासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले होते. दिनांक 14 नोव्हेंबर 2020 रोजी राज्य शासनाने दिनांक 16 नोव्हेंबर पासून पाडव्याच्या मुहुर्तावर महाराष्ट्रातील सर्व धार्मिकस्थळे खुली करण्याचे आदेश दिलेले आहेत.

अजून करोना व्हायरसचे सावट संपले नसून साईभक्तांना श्रींचे दर्शन सुलभरित्या व्हावे तसेच त्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने दर्शन रांगेत सॅनिटायझेशन करणे, थर्मल स्क्रिनिंग करणे व दर्शन रांगेत प्रवेश करताना पाय धुण्याची व्यवस्था आदी उपाययोजना संस्थानच्यावतीने करण्यात आल्या.

दर्शनासाठी आलेल्या भाविकांना गेट नंबर 02 मधून प्रवेश देऊन व्दारकामाई मंदिरातून समाधी मंदिरामधून दर्शन घेऊन गुरुस्थान मंदिर मार्गे 05 नंबर गेटव्दारे बाहेर जाणे असा मार्ग उपलब्ध करून देण्यात आला. लॉकडाऊननंतर सुमारे 08 महिन्यांनी श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आल्यामुळे भक्तांच्या अतिउत्साहामुळे दिवसभरात 08 हजार 290 साईभक्तांनी सामाजिक अंतराचे पालन करून श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ घेतला. यामध्ये शिर्डी ग्रामस्थ व शिर्डी पंच्यक्रोशितील भाविकांचा मोठ्याप्रमाणात सहभाग होता. तर मंदिर व मंदिर परिसरासह दर्शन रांगेत फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

पहाटे काकड आरतीनंतर साईभक्तांना गेट नंबर 2 मधून श्रींच्या समाधी मंदिरात दर्शनाकरिता प्रवेश देण्यात आला. तसेच श्री साई प्रसादालयात साईभक्तांकरिता भोजन प्रसाद सुरू करण्यात आला. दिवसभरात सुमारे 3 हजार साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला.

याठिकाणी प्रसाद भोजन घेण्यासाठी आलेल्या प्रथम 5 साईभक्तांचे व दुपारी 12 वाजता श्रींच्या माध्यान्ह आरतीकरिता प्रथम 10 शिर्डी ग्रामस्थांचे व 10 साईभक्तांचे पारंपारिक वाद्यांसह पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. तर साईभक्तांव्दारे देणगी कार्यालयात सुमारे 2 लाख 50 हजार रुपये देणगी प्राप्त झाली असल्याचे श्री. बगाटे यांनी सांगितले.

श्री साईबाबांचे मंदिर खुले झाल्यामुळे व संस्थानच्यावतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत साईभक्तांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच करोनाच्या पार्श्वभुमीवर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करताना यशस्वीपणे नियोजन करण्यासाठी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशिल आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या