Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरपाचेगाव ग्रामस्थांचे उपोषण आश्वासनानंतर मागे

पाचेगाव ग्रामस्थांचे उपोषण आश्वासनानंतर मागे

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे ग्रामपंचायतीचा अखर्चिक निधी आणि विविध योजनेच्या रखडलेल्या विकास कामासंदर्भात पाचेगाव ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर शनिवारी सकाळी सुरू केलेले उपोषण सायंकाळी विस्तार अधिकार्‍यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.

- Advertisement -

अखर्चिक निधी बरोबरच अपात्र ठरविलेल्या घरकुलांची चौकशी करणे, प्रभाग दोन आणि पाच मधील असे एकूण दोन जलकुंभांचे झालेले अति निकृष्ट दर्जाचे काम, जिल्हा परिषद मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची पूर्व व्यवस्था न करता शाळेचे निर्लेखन करण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीचे रखडलेले बांधकाम, विद्यार्थ्यांच्या बैठकीचा आणि शालेय पोषण आहाराचा प्रश्न, रखडलेल्या विविध योजना,गावातील रस्त्यावर साचलेले घाण पाण्याचे डबके, गावातील तुंबलेल्या गटारी अशा अनेक प्रश्नासंदर्भात ग्रामस्थ ग्रामपंचायत समोर उपोषणास बसले होते.

सायंकाळी पाच वाजता पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बाळासाहेब कासार यांनी उपोषण घटनास्थळी भेट देत उपोषणकर्त्यांशी चर्चा करून त्यानंतर त्या निवेदनात दिलेल्या सर्व कामाची चौकशी करून वीस दिवसांत अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर उपोषण कर्त्यांनीे उपोषण मागे घेतले. उपोषण सोडते वेळी ग्रामविकास अधिकारी शिवाजी वाहूरवाघ, उपसरपंच श्रीकांत पवार, ग्रामपंचायत सदस्य शांताराम तुवर उपस्थित होते.

उपोषणाला दिगंबर नांदे, ग्रामपंचायत सदस्य वामनराव तुवर, सोसायटीचे अध्यक्ष भगीरथ पवार, अशोक कारखान्याचे संचालक बाळासाहेब शिंदे, शेतकरी संघटनेचे हरिभाऊ तुवर,दत्तात्रय पाटील, जालिंदर विधाटे, प्रकाश जाधव, सोसायटीचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, हरिभाऊ जगताप,गोकुळ तुवर,शकील भेग, मन्सूर शेख, बाळासाहेब शिंदे, दादा पवार, भाऊसाहेब साळुंके, डॅनियल देठे, संदीप आव्हाड, शंकर तुवर, गंगाधर मतकर, ज्ञानेश्वर आढाव, जावेद शेख, अशोक पवार, संदीप शिंदे, बाळासाहेब टिक्कल, बापू माळी, विक्रांत पवार, सुनील पटारे आदी सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या