Thursday, April 25, 2024
Homeनगरपाचेगाव-खिर्डी दरम्यान ऊस वाहतूक बनली आव्हानात्मक

पाचेगाव-खिर्डी दरम्यान ऊस वाहतूक बनली आव्हानात्मक

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) पाचेगाव-खिर्डी (Pachegav-Khirdi) हा रस्ता गेली चाळीस वर्षांपासून निधीच्या (Fund) प्रतीक्षेत आहे पण अजून तरी या तीन किलोमीटर रस्त्यासाठी कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध होत नाही. आता ऊस वाहतूक करणारी वाहने या रस्त्यावर पलटी होत आहेत. ऊस वाळून त्यात मात्र शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Farmers Loss) होत.

- Advertisement -

सध्या सर्व कारखान्यांचे गाळप सुरू (Factory Crushing) आहे. सर्व कार्यक्षेत्रात ऊस तोडणी जोरात चालू आहे. पाचेगाव-खिर्डी रस्त्यासाठी (Pachegav-Khirdi Road) ग्रामस्थ व शेतकर्‍यांनी सर्व पक्षातील नेत्यांना निवेदनाद्वारे या रस्त्याच्या दुरवस्थेचे गांभीर्य लक्षात आणून देवून देखील या रस्त्यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याची शोकांतिका आहे.

या रस्त्यावर ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांच्या चालकांची पूर्णतः दमछाक होत आहे. त्यामुळे या भागातील ऊस क्षेत्र तोडणीस नको अशी प्रतिक्रिया या ऊस वाहतूकदारांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांना आपला ऊस तोडणीस आला तर वाहतूक करणारे नकार देण्याची धास्ती वाटत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांबरोबरच व कारखाना कर्मचार्‍यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

या रस्तासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून रस्त्याचे काम लवकर करावे अशी अपेक्षा या भागातील शेतकरी वर्गातून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या