Saturday, April 27, 2024
Homeनगरपाचेगाव-कारवाडी रस्ता बनला मृत्यूचा सापळा

पाचेगाव-कारवाडी रस्ता बनला मृत्यूचा सापळा

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील पाचेगाव ते कारवाडी रस्ता शेतकर्‍यांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावरून ये-जा करणार्‍या नागरिकांची पूर्णतः दमछाक होत आहे.

- Advertisement -

परिसरातील शेतकर्‍यांनी वर्गणी करून स्वखर्चाने मुरूम टाकून या रस्त्याची मलमपट्टी केली होती. मात्र या रस्त्यालगत शेतजमीनी असल्याकारणाने हा रस्ता पूर्ण डिपसॉईलचा आहे. त्यामुळे मुरुम टाकून रस्ता टिकू शकत नाही. रस्ता खडीकरण करून डांबरीकरण व्हावा, यामुळे खर्‍याअर्थाने शेतकर्‍यांना दिलासा मिळेल.

पावसाळ्यात हा रस्ता पुर्ण चिखलात हरवून जातो. हा रस्ता साडेपाच किलो मीटर अंतराच आहे. कारवाडी कडून पाचेगाव कडे येणारा रस्त्यापैकी दोन किलोमीटर रस्ता खडीकरण व डांबरीकरण झालेला आहे. त्यात एक किलोमीटर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या निधीतून करण्यात आला तर एक किलोमीटर विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांच्या निधीतून झालेला आहे. तर सहाशे मीटर तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य तुकाराम शेंडे यांच्या निधीतून झालेला आहे. पण उर्वरित तीन किलोमीटर असणारा रस्ता तयार करणे बाकी आहे. कारवाडी वरील नागरिकांना पाचेगावात ये जा करावी लागते. त्यासाठी त्यांना लोखंडीफॉल पाचेगाव फाटा मग पाचेगाव या रस्त्याने ये जा करणे भाग पडते.

सुधाकर शिंदे, किशोर शिंदे, चिलीया तुवर, विक्रम तुवर, राहुल शिंदे, दगडू शिंगोटे, छोटू साळुंके, दादा पवार, सुधाकर तुवर, ओंकार तुवर, विलास भिसे, सूर्यभान क्षीरसागर, वसंत भुसारी, किशोर भागवत, जगन्नाथ जाधव, तुषार जाधव, पांडुरंग शिगोटे, नंदू कदम आदी शेतकर्‍यांनी या रस्त्याने काम करण्याची मागणी केली आहे.

आम्ही या अगोदर पावसाळ्यात दोन वेळेस वर्गणी करून मुरूम टाकून मलमपट्टी केली. पण दर पावसाळ्यात रस्त्याचा प्रश्न उपस्थित होतो. या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून लवकरात लवकर रस्ता पूर्ण करून रस्त्याचा प्रश्न सोडवावा.

– सुधाकर प्रभाकर शिंदे, शेतकरी, पाचेगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या