Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकओझरची शान मिग विमान

ओझरची शान मिग विमान

ओझर । उमेश कुलकर्णी | Ozar

यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) संयुक्त महाराष्ट्राचे (maharashtra) पहिले मुख्यमंत्री (Chief Minister) बनले होते. मात्र 1962 युद्धात चीनने (china) भारताचा (india) पराभव केला आणि निर्माण झालेली आणीबाणी सावरण्यासाठी पंतप्रधान पंडीत नेहरूंनी (Pandit Nehru) यशवंतराव चव्हाण यांना संरक्षण मंत्री (Minister of Defence) म्हणून दिल्लीत बोलविले.

- Advertisement -

मुख्यमंत्री असलेल्या यशवंतरावांना दिल्लीच्या (delhi) तख्तावर विराजमान होण्यासाठी खासदार (MP) होणे आवश्यक होते. त्यावेळी त्यांची बिनविरोध निवड करण्यासाठी नाशिकने पुढाकार घेतला. साहजिकच या निवडीनंतर नाशिककरांचे (nashik) ऋण फेडण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी येथे मिग विमानाचा कारखाना (Mig aircraft factory) दिला.

चीन युद्धानंतर यशवंतरावांच्या नेतृत्वाखाली भारतीय संरक्षण धोरण (Indian Defense Policy) बदलण्यास सुरुवात झाली. रशियाशी (Russia) भारताचा मिकोयान मिग 21 (Mikoyan MiG 21) ही विमान खरेदीसाठी करार झाला. रशियाने तंत्रज्ञानाचे पूर्ण हस्तांतरण करण्याचे मान्य केले. म्हणजेच मिग विमानाची निर्मिती भारतात होणार होती.

यशवंतरावांनी हा मिग विमान कारखाना ओझरला सुरू करून नाशिककरांना दिलेले पूर्ण केले. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited) तर्फे ओझरमध्ये (ozar) 657 विमानांची प्रथम निर्मिती करण्यात आली. भारताचे हे पहिले सुपरसॉनिक विमान (Supersonic aircraft) 71 चे बांगलादेश (Bangladesh) युद्ध असो की 99 चे कारगिल युद्ध (Kargil War) प्रत्येक युद्धात पराक्रम गाजवून देशाची मान अभिमानाने उंचावली.

या गौरवशाली इतिहास असलेल्या मिग 21 या विमानावरून ओझरचे नाव मिग विमानाचं ओझर पडले आहे. साहजिकच कविवर्य कुसुमाग्रज यांनी नाशिकच्या सभेत यशवंतराव हे नाशिकचं ऋण फेडल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासन दिले होते.

यशवंतराव चव्हाण यांनी मिग विमानाचा कारखाना देवून नाशिककरांचे ऋण फेडले. ओझर मिग कारखान्यामुळे ओझर परिसराचा विकास होऊन ओझरचे अर्थकारण देखील झपाट्याने वाढले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या