Saturday, April 27, 2024
Homeनाशिकहक्काच्या जागेपासून ओझर पोलीस स्टेशन वंचित

हक्काच्या जागेपासून ओझर पोलीस स्टेशन वंचित

ओझर । वार्ताहर Ozer

ब्रिटीश कालखंडापासून सुमारे 20 ते 25 वर्षापासून गावकुसाला असलेली ओझर पोलीस स्टेशनच्या (Ozar Police Station) चार खोल्यांच्या चाळीची इमारत अद्यापही धुळ खात पडून असून या पोलीस स्टेशनला (Police station) हक्काची इमारत नसल्याने अतिसुरक्षा (एचएएल वसाहत) (HAL colony) विभागात बंदिस्त असलेल्या 3 कि.मी. पोलीस ठाण्यात नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.

- Advertisement -

गावात पोलीस ठाणे नसल्याने अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात बहरले आहे. त्यामुळे पोलीस आणि राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे धंदे चालणे अशक्य आहे. त्यामुळे गावातच पोलीस स्टेशनच्या जुन्या जागेवर अद्यावत पोलीस ठाणे व्हावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. ब्रिटीश काळाच्या आधी राजेशाही वहिवाटीत गावच्या मारूती वेसीच्या पूर्वबाजूस लासलगावच्या (Lasalgaon) होळकरवाड्या शेजारी सरकारवाडा (Sarkarwada) म्हणून न्यायनिवाडा चालायचा.

त्याच्या खुणा बुजल्या असल्या तरी आजही या भागास सरकारवाडा म्हणूनच ओळखतात. ब्रिटीश राजवट संपुष्ठात आल्यानंतर सुमारे 1948 नंतर गावच्या वेशी पडण्यापूर्वी बाजारपट्टीच्या हल्लीच्या पोलीसचौकी पासून थेट मारूती वेशीपर्यंत गावकोट होता. गावाला लागूनच पोलीस गॅटसाठी जागा देवून स्वतंत्र पोलिसांना रहाण्याची व्यवस्था करण्यात आली.

ते पोलीस गॅट म्हणजेच हल्ली (ग्रामपंचायत अन् 2908 मिळकत 1230/5 भोगवटदार पोलीस अधिक्षक नासिक (nashik) ग्रामिण 2020 पडित जागा 30.17 चौरस मीटर व अन् 2909 मालमत्ता 1231 पोलीस गेट सिंगल कौलारू चार खोल्या व पडित जागा). ब्रिटीशकालीन धुळखात पडलेल्या चार खोल्या त्याची साक्ष देत उभ्या आहेत. याच खोल्याच्या पूर्वबाजूस ग्रामपंचायत नोंद अ.क्र.2907 मिळकत क्रमांक 1230/4 ओझर कला, क्रिडा मंडळासाठी ही जागा आहे.

मध्यंतरी येथे काहीतरी होणार अशी चर्चा झाली मात्र ती हवेतच विरली. जागा असूनही त्याचा वापर नाही त्यामुळे या जागावर झोपड्या थाटून बिनदिक्तपणे बकाल वस्ती तयार होऊन या झोपड्या काढण्यास प्रशासनाला नाकी नऊ येत आहे. आता तेथे राहणारे या जागेवर हक्क सांगू लागले. पूर्वी पोलीस गेट अस्तित्वात आली.

त्यावेळी धार्मिक परंतू कडक शिस्तीचे शिरसाठ, दामु आण्णा, बाबूराव देशमुख नामक साहेब होऊन गेले अन् त्यांच्या जोडीला खाकीहाफ पॅण्टवाले दोन चपरासी होते. साहेबाला भजनाची आणि गाण्याची मोठी आवड. गावातील भगीरथ लढवा, भजनी मंडळ आणि त्याचे साथीदार यांना घेऊन या पोलीस गॅटवर तालासुरात भजन चालायचं. येथे हॉलीबॉल (Holyball) चांगलाच रंगायचा मात्र आज हीच जागा बकाल झाली आहे.

तालुक्याची साडेसतरा वर्ष सत्ता असणार्‍या ओझरमधील (ozer) सर्वांनाच याचा विसर कसा पडला? या जागेवर हक्काचे पोलीस ठाणे अथवा पोलीस वसाहत व्हावी अशी गावकर्‍यांची आशा कधी पूर्ण होईल? मागील दोन वर्षापूर्वी गृहखाते व महसूल विभागाने (Revenue Department) ओझरसह नाशिक तालुका (nashikk taluka), वाडीवर्‍हे (Vāḍīvar‍hē), त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar), सिन्नर (sinnar) या ठिकाणांहून अहवाल मागवत शासनाकडे प्रस्ताव दाखल केला होता.

मात्र हा प्रस्ताव अजूनही शासन दरबारी धूळ खात पडला आहे. सध्या ओझर पोलीस ठाण्यांतर्गत ओझर शहर व परिसरातील उपनगरे तसेच दीक्षी, दात्याणे, ओणे, जिव्हाळे, थेरगाव, कसबे सुकेणे, मौजे सुकेणे ही गावे येतात. या सर्व गावांचा विचार करता या ठिकाणचे पोलीसबळ अपुरे पडते. आयुक्तालयात गेल्यानंतर पोलीस कर्मचार्‍यांच्या संख्येत वाढ होईल.

त्याचप्रमाणे पेट्रोलिंगसाठी जादा वाहने, बीट मार्शलची संख्या वाढेल. नाशिकच्या धर्तीवर पेट्रोलिंग कर्मचार्‍यांसाठी कोड गेल्यानंतर स्कॅनिंगची सुविधा उपलब्ध होणार असून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह अधिकार्‍यांच्या संख्येत देखील वाढ होईल. त्यामुळे येथील पोलीस स्टेशनला अद्यावत इमारत मिळणार कधी अन् पोलीस कर्मचार्‍यांची संख्या वाढणार कधी असा प्रश्न येथील नागरिकांना सतावत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या