Saturday, May 11, 2024
Homeनगरप्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन प्लान्ट

प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन प्लान्ट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी (possible third wave of corona) प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प अथवा ऑक्सिजन साठवणूक क्षमता निर्माण (Oxygen generation projects or creation of oxygen storage capacity) करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यादृष्टीने तालुका यंत्रणांनी या सुविधा निर्मितीसाठी आवश्यक पाठपुरावा करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित (Resident Deputy Collector Sandeep Nichit) यांनी दिल्या.

- Advertisement -

करोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात आता जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली (district administration started preparations) आहे. त्याचा आढावा निवासी उपजिल्हाधिकारी निचित यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. बांगर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे आदी जिल्हा मुख्यालय येथून तर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी हे तालुका स्तरावर उपस्थित होते.

यावेळी निचित म्हणाले, जी हॉस्पिटल्स 50 पेक्षा जास्त बेडस क्षमतेची आहे, त्यांनी त्यांना आवश्यक असणारा ऑक्सीजन साठवण्यासाठीची व्यवस्था कऱणे, ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारणी (Oxygen generation project erection), जम्बो सिलींडर (Jumbo cylinder), ड्युरा सिलींडरची व्यवस्था (Arrangement of dura cylinder)आदींची सुविधा करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ऑक्सीजन निर्मिती (Oxygen production) करणार्‍या उद्योगांबरोबर करार करून घेणे आवश्यक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या