Friday, April 26, 2024
Homeजळगावविद्यार्थ्यांसह शिक्षकांची होणार ऑक्सीजन लेव्हलची दररोज नोंद

विद्यार्थ्यांसह शिक्षकांची होणार ऑक्सीजन लेव्हलची दररोज नोंद

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

येत्या 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु होणार असून दोन शिफ्टमध्ये शाळा भरणार आहे. तसेच दररोज चार तास अध्यापन होणार आहे.

- Advertisement -

शाळांमधील शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची आरटीपीसीआर ही कोरोना चाचणी केली जाणार असून विद्यार्थ्यांसह शिक्षक व अन्य कर्मचार्‍यांच्या तापमान व ऑक्सीजन लेव्हलची दररोज नोंद ठेवली जाणार आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग दि. 23 नोव्हेंबरपासून भरविले जाणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा अवघी चार तासच सुरु असणार आहे.

सकाळी साडेसात ते साडेअकरा किंवा दुपारी दीड ते सायंकाळी साडेपाचपर्यंत चार तास सुरु ठेवण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. एका वर्गात अवघे 20 विद्यार्थी बसविले जाणार आहेत.

राज्यात फेब्रुवारी महिन्यानंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर सावध पवित्रा घेत राज्य सरकारने नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरविण्याचे नियोजन केले आहे.

शाळेत दाखल होणार्‍या मुलांच्या पालकांचे संमतीपत्र त्यासाठी बंधनकारक करण्यात आले आहे. दुसरीकडे मुलांचे वर्ग एकदिवसाआड भरणार असून त्यात आज शाळेत आलेल्या मुलाला दुसर्‍या दिवशी सुट्टी दिली जाणार आहे.

त्यात इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांना प्राधान्य दिले जाणार आहे. शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी थर्मल स्कॅनिंग करावे. त्यात कोविडची लक्षणे दिसणार्‍या कर्मचार्‍यांची आरटीपीसीआर चाचणी करावी व ज्याच्यामध्ये लक्षणे दिसणार नाही.

त्यांची पुन्हा चाचणी करावी. तथापी सदर पुन्हा केलेल्या चाचणीत काही शंका असल्यास त्यांची आरटीपीसीआर चाचणी करावी, असे आदेश शिक्षण विभागाने नव्याने जारी केले आहेत. दरम्यान, गेल्या आठ महिन्यापासून विद्यार्थी पारंपरिक शिक्षण प्रवाहपासून वंचित आहे.

आता प्रत्यक्षात वर्ग सुरु करण्याची शिक्षण विभागाने तयारी केली आहे. कोरोनाविषयी पालकांमध्ये भितीयुक्त वातावरण आहे. शिक्षकांनी भयमुक्तीसाठी चाचणी करावी, असे आवाहन प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या