Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यासर्व रुग्णालयांचे ऑक्सिजन,फायर ऑडिटचे निर्देश

सर्व रुग्णालयांचे ऑक्सिजन,फायर ऑडिटचे निर्देश

मुंबई | प्रतिनिधी

नाशिक आणि विरार येथील रुग्णालयांमध्ये झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडीट करतानाच ऑक्सिजन ऑडिट करण्याचे निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी शुक्रवारी जिल्हा यंत्रणेला दिले.

- Advertisement -

ऑक्सिजन टॅंकरना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला असून पोलिस संरक्षणात त्याची वाहतूक करावी. तसेच परस्पर ऑक्सिजन टॅंकर वळवू नयेत, अशा सूचनाही कुंटे दिल्या.

राज्यातील कोरोनाची स्थिती, ऑक्सिजन, रेमडीसीवीरची उपलब्धता, रुग्ण व्यवस्थापन याबाबींचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी आज सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व रुग्णालयांचे तातडीने फायर ऑडीट करतानाच आगीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्याचे सांगितले.

सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर घेण्यात यावे. जेणेकरून सिलेंडर आणि लिक्विड ऑक्सिजनवरील अवलंबत्व कमी करता येईल, असे कुंटे यांनी सांगितले. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी पीएसए तंत्रज्ञानावर आधारित ऑक्सिजन प्लांट उभारावेत, असेही मुख्य सचिव म्हणाले.

ऑक्सिजन टॅंकरला पोलीस संरक्षण
राज्यात ऑक्सिजन टॅंकरची वाहतुक कुणीही रोखू नये त्यासाठी त्याला रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला आहे. पोलिस संरक्षणात या टॅंकरची वाहतुक करण्यात यावी. कुठल्याही प्रकारे ऑक्सिजन टॅंकर वळविण्यात येऊ नये. यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात नियोजनबद्धरित्या ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा असे सांगतानाच आज रात्री (शुक्रवार) विशाखापट्टणम् येथून रेल्वेद्वारे ऑक्सिजन टॅंकर येणार असून त्यातील चार नागपूर आणि नाशिक येथे पाठविण्यात येतील, असे सीताराम कुंटे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या